Posts

Showing posts from June, 2017

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रजातंत्राचा प्रणेता-तात्या टोपे                               (ऐतिहासिक कादंबरी)                                                                     लेखिका- सौ.पुष्पा काणे                                                                           येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान                                                                           ...

प्रकरण २ रे ब्रह्मावर्त

                                          प्रकरण २ रे                ब्रह्मावर्त पुंडलिक वरदा हारि विठ्ठल!       श्री ज्ञानदेव तुकाराम !      म्हणा, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ! सगळे प्रेक्षक श्रोते म्हणू लागले, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ! विठ्ठलाच्या नामगजरानं देवळाचा घुमट भरून गेला. सगळे एकतान झाले. प्रेक्षकांची एकाग्रता झालेली पाहून बुवांनी सगळ्यांना थांबवत म्हटले,  ‘होऽ!’ निरूपण करत  बुवा पुढे म्हणाले, ‘इकडे सत्ता हाती येताच नवे पेशवा श्रीमंत नानासाहेबांनी ब्रह्मावर्ताचं रूप बदलून टाकलं. हे रूप कसं बदललं?- बघूया - चला, ब्रह्मावर्तातल्या नानासाहेबांच्या महालातच जाऊ या. चला. बुवा गाऊ लागले.       रामा रामा नरोत्तमा रामा। राम राम, सीताराम सीताराम । गात गातबुवांनी स्वत;भोवती एक गिरकी घेतली आणि सांगू लागले,    श्रोतेहो!         बघा, बघा, नानासाहेब...

प्रकरण ३ रे तात्यांकडे कन्यारत्न

          प्रजातंत्राचा प्रणेता                    प्रकरण ३ रे                                            तात्यांकडे कन्यारत्न   काही क्षणांनंतर एक सेवक आला. ‘ स्वामींचा विजय असो.’’  मुजरा करीत त्याने सांगितलं, ‘बाहेर एक इसम निरोप देऊन गेला. अमात्यांच्या घरी कन्या रत्न जन्मास आले.          रावसाहेब आनंदाने उद्गारले,  ‘अरे वा वा वा! तात्यांकडे खूश खबर आहे. वहिनसाहेबांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला आहे.  ’’ नानासाहेबांनीही आनंद व्यक्त करीत म्हटलं, ‘ अरे वा! तांब्यांची मनू लग्न होऊन सासरी निघाली आणि तात्यांच्या घरात नवीन मनू आली. ’’     ‘मनकर्णिका ! मनकर्णिका आली.’’  तात्या स्वत:शीच उद्गारले आणि नानासाहेबांची अनुज्ञा घेत म्हणाले, स्वामी मला आज्ञा द्यावी.’’ तात्यांनी नानासाहेबांना लवून नमस्कार करत जाण्याची परवानगी मागितली.   नानास...

प्रकरण ४ थे पेशव्यांचा तनखा बंद

                                   प्रजातंत्राचा प्रणेता.        प्रकरण ४ थे        पेशव्यांचा तनखा बंद   आळेकर महाराज श्रोतृवृंदाला म्हणाले, म्हणा, पांडुरंग हरी, वासुदेव हरी.  दोनतीनदा तेच  आळवलं आणि मग नामस्मरण, विठ्ठल, विठ्ठल,विठ्ठल /श्रोते शांत झाल्यावर त्यांनी नामस्मरण थांबवत म्हटलं,     ‘‘ होऽ!’’ आळेकर महाराजांनी आपला मोर्चा पेशव्यांच्या महालाकडे वळवला. तिकडे महालात जेन आली आहे. तिचा नवरा टॉड आला आहे. पेशव्यांच्या वाड्यात त्यांचा पाहुणचार होत आहे.   टॉड सकाळीच उठून बैठकीत आला. जरा वेळानं सेवक येऊन काही वृत्तपत्रं ठेवून गेला. टॉडनं एक वृत्तपत्र उचललं. सेवक म्हणला, ‘ स्वामीमहाराजांसाठी आहेत.’’ टॉडनं वृत्तपत्र खाली ठेवलं, तो दूरूनच एका वर्तमानपत्रावर नजर फिरवू लागला.         जरा वेळानं नानासाहेब  तिथे आले. टॉडनं उभं राहून त्यांना अभिवादन करीत म्हटलं, ‘ गुड मॉर्निंग सर. ’’ ‘ शुभ प्रभात. ’’ ...

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका

                  प्रजातंत्राचा प्रणेता          प्रकरण ५ वे    पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका    इकडे देवळात हे सर्व ऐकता ऐकता श्रोते स्तब्ध झाले होते. ज्या इंग्रजांच्या हातात पेशव्यांनी आपली रियासत सोपवली होती. ती रियासत परत न करता त्याच्या बदल्यात देणारा तनखा बंद करण्याच्या गोष्टी करीत होते. बोलता बोलता कीर्तनकार आळेकर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. हातातले टाळ धीमेपणानं वाजवित ते प्रश्‍नामागून प्रश्‍न उभे करत होते. माणूस इतका निष्ठूर असू शकतो? मागचं सगळं विसरू शकतो? उपकाराची फेड अपकारानं करू शकतो?     कीर्तन ऐकणार्‍या श्रोत्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.        श्रोतेहो ! केवढा हा आघात? केवढा अपेक्षा भंग? ज्यांना आपलं आपलं म्हटलं, त्यांनी  केवढा घात केला? नानासाहेब तर पार खचलेच. पण लगेच त्यांनी स्वत:ला सावरलं. या मानभंगातून उत्पन्न झालेल्या सूड भावनेनं उग्र रूप धारण केलं. नानासाहेबांनी इंग्रजांना उद्देशून एक खलिता तयार   केला....

प्रकरण ६ वे ‘दिल्लीत गर्दी नको, आपण कानपुरातच थांबू’, नानासाहेब.

                       प्रजातंत्राचा प्रणेता      प्रकरण ६ वे        ‘दिल्लीत गर्दी नको, आपण कानपुरातच थांबू’, नानासाहेब. इकडे देवळात आळेकर बुवांनी सांगायला सुरुवात केली, सकाळची मंगल वेळ. तात्यांच्या घराची ओसरी, समोर तुळशी वृंदावन. आजूबाजूला वृक्ष. फुलझाडं. एका वृक्षाखाली पार बांधलेला. सडासंमार्जन आटोपून तात्यांची पत्नी जानकी हातात पूजेचं तबक घेऊन अंगणात आली. तुळशीची पूजा केली. तेवतं निरांजन तुळशीपुढे ठेवलं. जानकीनं हात जोडून डोळे मिटले आणि ती म्हणू लागली-- शुभम् करोती कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा!  शत्रूबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते!! हे तुलसी माते, माझ्या पतींच्या चातुर्याचं, पराक्रमाचं तेज ह्या ज्योतीसारखंच कायम राहो. तिने नमस्कार केला. इतक्यात मागून हळूच हाळी आली,‘ जानकी ! ’’    जानकी दचकली. ‘  अरे, स्वामी, आपण? आपण केव्हा आलात?  ’’ तात्या हसले. म्हणाले, ‘तू ह्या तुळशी मातेजवळ माझ्यासाठी आशीर्वाद मागत होतीस तेव्हाच. जानकी खरं सांगू? तुझ्या ह्य...

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

 प्रजातंत्राचा प्रणेता.   प्रकरण ७ वे          ‘इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.     इकडे देवळात कीर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्यांना आळेकर बुवा सांगत होते.‘अहो! शिपायांना पेशव्यांचं म्हणणं पटलं. त्यांचं सैन्य कानपूरकडे परत चालू लागलं. तिथे पोचल्यावर तात्यांनी शिपायां कडून रोज कवायती करून घ्यायला सुरुवात केली. शिपायांचा आत्मविश्‍वास वाढवण्याचं काम तात्या करीत होते. अहो! म्यानात राहून पडल्यामुळे तलवारी गंजतात, तसच सैन्याचही आहे. कवायतींशिवाय शिपाईही आळशी होऊ लागतात. निस्तेज होऊ शकतात, असं तात्यांचं मत होतं. नानासाहेब मात्र थोडे उदास होते? खचले होते का? नाही हो, उठावाची तारीख ठरली होती, पण त्यापूर्वी आपले शिपाई इतक्या कमी वेळात तयारी करू शकतील का, याची नानासाहेबांना काळजी वाटत होती. आपल्या प्रजेची काळजी वाटत होती. वाड्यात त्यांनी अथर्वशीर्षाचं पठण सुरू केलं. गणपतीसमोर बसून नानासाहेब गणपतीराजाला आवाहन करत होते. विनवीत होते, ’हे गणराया, माझ्या प्रजेचं रक्षण कर. हे विघ्नहर्त्या, पारतंत्र्याशी मुकाबला करण्याच...

प्रकरण ८ वे पेशव्यांचा शब्द मोडला. अनुचित कत्तल.

                            प्रजातंत्राचा प्रणेता         प्रकरण ८ वे           पेशव्यांचा शब्द मोडला. अनुचित कत्तल. तात्यांनी पेशव्यांकडे दूत पाठवून निरोप दिला, ‘स्वामी, जनरल व्हीलरनं तटावर शांततेचं निशाण  उभारलं असून युध्द थांबवलं आहे. ’’     पेशव्यांनी मान डोलावली आणि हुकूम दिला. ‘ ठीक आहे. आता युध्द तहकूब. अझिमुल्लाखान जनरल व्हीलरना चिठ्ठी लिहा. ज्या लोकांचा डलहौसीच्या राजकारणाशी संबंध नसेल त्यांना अलाहाबादला पाठवण्यात येईल.’’ नानासाहेबांच्या मनात त्यांच्या बद्दल कणव असली तरी शिपायांच्या आणि लोकांच्या मनात क्रोध धुमसत होता. इंग्रजांनी केलेले अत्याचार ते विसरू शकत नव्हते.       २१ दिवसांच्या वेढ्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी कानपूर शहरावर विजय मिळवला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या नावाची दवंडी पिटण्यात आली. तबला वादकानं डग्ग्यावर थाप वाजवत दवंडी दिली.    ‘ ऐका हो, ऐका श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी कानपूर नगरावर विजय मि...