प्रकरण २ रे ब्रह्मावर्त
प्रकरण २ रे ब्रह्मावर्त
पुंडलिक वरदा हारि विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम !
म्हणा, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ! सगळे प्रेक्षक श्रोते म्हणू लागले, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल !
विठ्ठलाच्या नामगजरानं देवळाचा घुमट भरून गेला. सगळे एकतान झाले. प्रेक्षकांची एकाग्रता झालेली पाहून बुवांनी सगळ्यांना थांबवत म्हटले, ‘होऽ!’
निरूपण करत बुवा पुढे म्हणाले, ‘इकडे सत्ता हाती येताच नवे पेशवा श्रीमंत नानासाहेबांनी ब्रह्मावर्ताचं रूप बदलून टाकलं. हे रूप कसं बदललं?- बघूया - चला, ब्रह्मावर्तातल्या नानासाहेबांच्या महालातच जाऊ या. चला. बुवा गाऊ लागले.
रामा रामा नरोत्तमा रामा। राम राम, सीताराम सीताराम । गात गातबुवांनी स्वत;भोवती एक गिरकी घेतली आणि सांगू लागले,
श्रोतेहो!
बघा, बघा, नानासाहेब पेशव्यांचा ब्रह्मावर्तातील नव्यानं सजवलेला महाल. आजूबाजूला रंगीबेरंगी मखमली पडदे. खाली गालिचे पसरलेले, जागोजागी मोठमोठे बिलोरी आरसे, युरोपियन कारागिरीचं निरनिराळं काचेचं सामान, मेणबत्त्यांची सुंदर झाडं, हस्तिदंताचं सोन्यावर केलेलं रत्नजडित नक्षीकाम केलेल्या वस्तू. अमात्य तात्यांना हे फारसं रुचलं नाही. पण, पेशवे त्यांचे स्वामी. नानासाहेबांनी ब्रह्मावर्तांचं रूप बदललं, त्यातली एक गोष्ट मात्र तात्यांना खूप आवडली. मागे एका भिंतीवर शिवाजी महाराज, राणा प्रतापसिंह आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्या मोठमोठ्या तसबिरी लावल्या होत्या. रोजच्याप्रमाणे तात्या टोपे मुख्य दालनात प्रवेशले, त्यांनी भक्तिभावानं एका एका तसबिरीला आदरानं प्रणाम केला. पहिल्या बाजीरावांच्या तसबिरीनंतर त्यांची ढाल व तलवार ठेवलेली होती. बाजीराव पेशव्यांच्या ढाल आणि तरवारीवर हात ठेवत तात्या नि:शब्दपणे उभे राहिले. मध्यम उंची, कणखर शरीरयष्टी, पिळदार बाहू, रंग सावळा, तजेलदार उभट चेहरा, टपोरे डोळे आणि त्या डोळ्यात देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न.
तात्या स्वत:शीच बोलू लागले. पहिले बाजीरावजी पेशवे, राऊमहाराज. शिवाजी महाराजांच्या परराक्रमाचा आदर करणारे. शाहूमहाराजांचे सेवक. हे शूरवीर पुरूषा, प्रणाम. तुमच्या शूरत्वाला, चातुर्याला, मुत्सद्दीपणाला युद्धातल्या कौशल्याला, ह्या तात्या टोपेचं तुम्हाला शतश: वंदन. तुमच्यासारखा दूरद्रष्टा, युद्धकलानिपुण पेशवा होऊन गेला म्हणूनच हिंदुस्थानचा कितीतरी प्रदेश शत्रूच्या तावडीतून हिसकावून परत आणता आला. महाराज, या तात्याला तीच शक्ति द्या. इतक्यात बाहेर दरवानानं ललकारी दिली. श्रीमंत नानासाहेब पेशवे येत आहेत.
होऽऽऽ. नानासाहेब पेशव्यांचा विजय असो. नानासाहेब पेशव्यांच्या आगमनाची सूचना देण्यात आली.
नानासाहेब पेशवे गंभीरपणे एक एक पाऊल टाकत आत आले. उंचपुरे, किंचित् स्थूल बांधा, गोरा रंग, वाटोळा चेहरा, पाणीदार, मोठे, चंचल डोळे. अंगात जरतारी किनखाबी पोशाख. नानासाहेब स्थानापन्न झाले. त्यांच्या बरोबर त्यांचे पुतणे रावसाहेब आत आले. नानासाहेबांना मुजरा करून इकडे तिकडे पहात ते म्हणाले, काकासाहेब, आपल्या पिताश्रींच्या पश्चात आपण ह्या ब्रह्मावर्ताचं रूप अगदी बदलून टाकलं.
‘हूंऽऽ. रावसाहेब, पेशव्यांना शोभेल अशा इतमामानं रहायलाच हवं, नाही का?’’ नानासाहेब उत्तरले. ‘खरं आहे. आपण पेशव्यांचे वंशज. आपण तर या पेशव्यांच्या गादीचे वारसदार.’ रावसाहेबांचं बोलता बोलता मागे तसबिरीसमोर आपल्याच विचारात उभ्या असलेल्या तात्यांकडे लक्ष गेलं.
‘ अरे ! तात्या तुम्ही रावजींच्या तसबिरीपुढे का उभे? कसला विचार करता आहात? ’’
‘ ऊं- काही नाही. ’’ तात्यांनी उत्तर देण्याचं टाळलं.
‘ तरीपण? तात्या, काकासाहेबांनी दौलतीत केलेले बदल तुमच्या मनास आले नाहीत का?’ रावसाहेबांनी मिस्कील स्वरात विचारलं, पण तात्या स्तब्ध होते.
नानासाहेबांना तात्यांचं स्तब्ध राहणं जरा खटकलं, ते उद्गारले, ‘ तात्या, मनात असेल ते स्पष्ट बोलून टाका.’’
तात्या पुढे आले. पेशव्यांना मुजरा करीत म्हणाले, ‘ स्वामी ! ’’
‘ तात्या, विसरलात, आम्ही, तुम्ही आणि तांब्यांची मनू लहानपणापासूनचे मित्र आहोत. आमचे पिताश्री दुसरे बाजीराव पेशवे यांनी आपली पुण्याची सगळी रियासत इंग्रजांच्या हाती सोपवली आणि इथे कानपूरजवळ ब्रह्मावर्तास येऊन राहिले. तुमचे पिता पांडुरंगपंत येवलेकर, मनूचे पिता मोरोपंत तांबे, रामचंद्रपंत आणि कितीतरी जण कुटुंबासह पिताश्रींबरोबर इथे आले.
रावसाहेबांनी नानासाहेबांचं बोलणं पुढे नेत म्हटलं, ‘ हो. आजोबांना गोर्या साहेबानं आठ लाख रूपये पेन्शन द्यायचं ठरवलं, म्हणून तर आजही एवढ्या कुटुंबांचं पालनपोषण होतं आहे.’’
तात्यांनी मोठा निश्वास टाकला, म्हणाले, ‘हूं - -. आपले देशवासी परक्यांच्या हाती गेले आणि परदेशवासी जवळचे वाटू लागले. बोलताबोलता तात्यांचा स्वर चढला. ते चिडले होते. आता तर परदेशवासी आमच्या या पेशव्यांना इतके जवळचे वाटतात की, त्यांच्याच सोयींचा विचार होऊ लागला आहे. पहा, पहा, पेशव्यांच्या महालात तिकडे बिलोरी आरसे आले. त्या गोर्या पायांसाठी जमिनीवर मऊ मखमली गालिचे अंथरले गेले. त्यांच्या भोजनासाठी काचेच्या बशा आल्या, बुटलेर आले. इतकंच नव्हे तर पेशव्यांच्या या महालात साहेबाला खूश करण्याकरता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मेमसाहेबांसाठी नृत्यालयंसुध्दा सजवली गेली.’’
रावसाहेब स्मित करीत म्हणाले, ‘ अहो तात्या, हे सगळं करावंच लागतं. म्हणून तर पेशव्यांना - - ’’
तात्यांनी रावसाहेबांचं बोलणं मधेच थांबवलं. ते उपरोधानं म्हणाले,‘ हो, हो. पेशव्यांना आठ लाख तनखा मिळतो ना इंग्रजांकडून, तेव्हा त्यांच्या सुखसोयींचा विचार करायलाच हवा. आपलं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं, आपली प्रजा त्यांच्या हाती सोपवली आणि आता मिंधेपणानं त्यांची सेवा करायची. बस्स. ’’
‘ तात्या यात आमचा काय दोष? जे झालं ते पिताश्रींकडून.’’ नानासाहेब तात्यांची समजूत घालून पाहू लागले.
तात्या खिन्नपणे बोलू लागले. ‘हूं - -पिताश्री, दुसरे बाजीराव. कुठे पहिले बाजीराव पेशवे. ज्यांनी आपल्या पराक्रमाने शत्रूला नमवलं. हिंदूस्थानातला बहुतांश प्रदेश जिंकून स्वतंत्र केला. हे दुसरे बाजीराव. तात्यांनी खिन्नपणे स्मित केलं, पूर्वजांच्या शौर्याची आठवण म्हणून केवढ्या आशेनं वडील मंडळींनी त्यांना हे नाव दिलं असेल? पण- सगळी रियासत इंग्रजांच्या हातात देऊन इकडे आले. तात्यांनी एक दीर्घ निश्वास टाकला.
‘ तात्या, म्हणून तर त्यांच्या नावे फिरंग्यांकडून इतका तनखा मिळतो.’’ रावसाहेब उद्गारले. तात्यांच्या मनात पुन्हा एकदा पाल चुकचुकली.
‘ हो. पण हा तनखा उद्या बंद झाला तर? ’’ तात्यांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. रावसाहेबांना ते मुळीच रुचलं नाही. त्यांचा स्वर थोडा चढला.
‘ असं होऊच शकत नाही. तात्या, असं होऊच शकत नाही. अहो ! पुण्याची रियासत, तिकडचं सगळंच सोडून आजोबा इकडे आले. कितीतरी कुटुंबं त्यांच्याबरोबर आलेली आहेत. आता पेशव्यांचा तनखा बंद झाला तर हा एवढा खर्च भागणार कसा? तात्या, तनखा बंद होण्याची भाषा बोलूच नका. आजोबांचे इंग्रजांशी चांगले संबंध होते. आमच्या काकासाहेबांनीही हीच प्रथा पुढे चालू ठेवली. इतकं च नाही तर त्यांच्यासाठी कितीतरी सोयीसुविधा केल्या आहेत. “नाही का काकासाहेब?’’ नानासाहेब स्तब्ध होते.
रावसाहेबच पुढे म्हणाले, ‘ तात्या, गोरासाहेब असं काहीही करणार नाही. ’’
तात्या गंभीर झाले. ‘रावसाहेब, इंग्रज जे काही करतात ते योजनापूर्वक करतात.’’ नानासाहेबांकडे पहात तात्या बोलत होते, ‘नानासाहेब आठवतं? तुमच्या पिताश्रींकडे पेशव्यांच्या दरबारात गोर्या लोकांची मैफल जमायची. कलेक्टर, कर्नल, पाद्री ओस्वाल्ड. ’’
मागच्या आठवणीने नानांना हसू आलं, ते म्हणाले, ‘हो. तात्या, तुमच्या डोक्यात शिपाई होण्याचं भूत शिरलं होतं, तेव्हा पिताश्रींनी तुम्हाला ओसवाल्डकडेच पाठवलं होतं.’’
‘हो. ओस्वाल्डनं कलेक्टरकडे. कलेक्टरनं कर्नलकडे पाठवलं. कर्नलनं एक चिठ्ठी देऊन मला सांगितलं, -- टुमको सेना मे भरती होने शे पयले हमारे डॉक्टरसे चेकअप करना होगा. जांच- -जांच करालो. ’’
रावसाहेबांना हसू आवरेना, ‘तुमची जांच? तात्या, तुम्ही तर आत्ता चाळिशीतही धडधाकट आहात. तगडे आहात. लहानपणापासून घोड्यावर रपेट करता. आजही तलवार, दांडपट्टा फिरवता.’’
‘ हो, रावसाहेब, मलाही त्यावेळी तसंच वाटलं. पण त्या डॉक्टरनं मला तपासलं आणि एक चिठ्ठी देऊन कर्नलकडे पाठवलं. कर्नल म्हणाले, टुम सेना मे भरटी होने लायक नही हो. ’’
‘ काय? तुम्ही? तुम्ही लायक नाही? ’’ आता मात्र रावसाहेबांना हसता हसता पुरेवाट झाली. हाताने टाळी वाजवत ते हसत होते.
“तात्या, तुमच्या सारखा तरणाबांड शिपाई व्हायला लायक नाही? पण का? कारण? ’’
‘ कारण, तात्या येवलेकरचं काळीज कमजोर आहे. ’’ नानासाहेब गंभीर स्वरात उत्तरले.
रावसाहेबांना अजूनही हसू आवरत नव्हतं.कमाल आहे, कमाल आहे त्या डॉक्टरची?’’
‘ नाही रावसाहेब कमाल आहे गोर्या साहेबाची. इंग्रज जे काही करतात ते योजना पूर्वक करतात.’’ तात्यांनी स्पष्टीकरण दिलं.
‘ पण तुम्ही कसं ऐकून घेतलं? तुम्ही त्यांना दाखवून द्यायचं. ’’ रावसाहेबांनी विचारलं.
त्यावर तात्या उत्तरले, ‘ मी तयार होतो. घोड्यावर रपेट मारून दाखवायला, दांडपट्टा फिरवून दाखवायला, पण कर्नल म्हणाला, देखो, टुमच्या पक्षी डॉक्टरला जादा समजतं. ’’
‘ कमाल आहे?, ’’ काहीही न उलगडल्यामुळं रावसाहेबांनी नानासाहेबांकडे पाहिलं.
नानासाहेब म्हणाले, ‘ जाऊ द्या . सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. ओस्वाल्ड, कर्नल सगळे परत गेले. आता नवीन साहेब आले आहेत ते बरे आहेत. ’’
तात्यांनी नकारार्थी मान हलवीत म्हटले,‘ स्वामी, भ्रम आहे आपला. ह्या गोर्या लोकांवर विश्वास ठेवू नका. बाहेरून जितके गोरे तेवढंच त्यांचं अंतरंग काळं ! पण नेमकं तेच लोकांना कळत नाही. गोर्यांच्या सैन्यात काळे लोक भरती होताहेत. काळेच काळ्यांशी लढताहेत. हूंऽऽ, सैन्यात नसलेलेही त्यांचेच गोडवे गाताहेत. ’’
‘ तात्या! ’’ नानासाहेबांनी तात्यांकडे पाहिले.
‘ स्वामी, मला सांगा खोटं आहे का हे? अमात्य रामचंद्रपंतांना विसरलात? ’’ तात्यांच्या प्रश्नाने नानासाहेब एकदम गंभीर झाले.
रावसाहेबांना मात्र राहवले नाही. त्यांनी विचारलं, ‘ तात्या, रामचंद्रपंत तर स्वेच्छेने तडक तीर्थयात्रेला गेले ना? मग? बिचारे थकले होते. त्यांनी सरळ तात्यांच्या हाती कारभार सोपवला. असंच सांगितलं जातं, नाही का? .’’
‘ हूं ऽ-- करून सवरून भागले-- तीर्थयात्रेला गेले.. ’’
‘ म्हणजे? ’’ प्रश्नार्थक मुद्रेने रावसाहेब उद्गारले. त्यांनी तात्यांकडे पाहिलं त्यांनी तोंड दुसरीकडे फिरवलं. मग रावसाहेबांनी नानासाहेबांकडे पाहिलं.
नानासाहेब अस्वस्थ झाले. ‘ जाऊ द्या नं. झालं गेलं गंगेला मिळालं. ’’
‘नाही. कळू द्या. स्वामी. पंतांनी आपल्या पिताश्रींची बेमालूम खोटी सही करून त्यांचा तनखा बंद करण्याचं पत्र तयार केलं होतं, आठवतं?’’. तात्यांनी नानासाहेबंकडे पहात विचारलं.
नानासाहेब जुन्या आठवणीत हरवले, आपल्याशीच बोलू लागले. ’पेशव्यांचे अमात्य रामचंद्रपंत यांच्याकडे तात्या मदतनीस म्हणून राहिले. पेशव्यांचं पेन्शन बंद करण्याचं रामचंद्रपंताचं कारस्थान तात्यांनी फार हुशारीने श्रीमंतांच्या कानावर घालून तो बेत हाणून पाडला. पंतांनी सेवेतून निवृत्त होऊन काशी विश्वेश्वराची यात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच अमात्य म्हणून काम करण्यास तात्याच योग्य असल्याची शिफारस केली. तात्यांचं चातुर्य पाहून त्यांना स्वत: बाजीराव पेशव्यांनी नऊ अनमोल रत्ने जडवलेली टोपी दिली. तेव्हापासून त्यांना तात्या येवलेकर ऐवजी तात्या टोपे या नावानंच सर्व संबोधू लागले. ’
‘काय? ’’ आश्चर्याने रावसाहेबांच्या तोंडाचा चंबू तसाच राहिला. आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं.
नाना बोलतच होते, ‘ तात्या,आजही सगळं आठवतं. तात्या, त्या सगळ्यातून तुम्हीच त्यांना सोडवलं. ’’
‘पण स्वामी, पुन्हा कोणाची बुद्धी फिरणार नाही कशावरून? ’’ तात्यांच्या मनातली शंका.
‘ हूंऽऽ . ’’ नानासाहेबांनी हुंकार दिला.
रावसाहेबही उद्गारले. ‘ पण तात्या, आता तुम्हीच पेशव्यांचे अमात्य आहात. ’’
सर्वच गंभीर झाले. सर्वत्र शांतता पसरली.
याचवेळी बाहेर दरवानाशी भांडताना मनूचा आवाज आला. नानासाहेबांनी तात्यांकडे पाहिलं. तात्यांनी रावसाहेबांकडे द्दष्टिक्षेप टाकला आणि तिघेही गालातल्या गालात हसले. तितक्यात मनू तणतणत आत आली, म्हणाली, ‘ मला माहीत आहे, नाना आता पेशवा झाले आहेत. माहीत आहे. पण म्हणून काय त्यांच्या अनुमतीशिवाय त्यांना भेटायचं नाही? वा रे वा. नाना तुम्हाला मी सांगून ठेवते, उद्या तुम्ही सम्राट जरी झालात तरी तुमच्या भेटीसाठी मी अनुमती मागत बाहेर तिष्ठत बसणार नाही. हो!. ’’
नानासहेब हसले , ‘ अग, पण हो, जरा शांत हो. ’’
मनू नकारार्थी मान हलवून म्हणाली, ‘ अंहं तुम्ही आधी कबूल करा. ’’
तात्या हसून बोलले, ‘ हां. स्वामी, हे मात्र खरं हं. तुमच्या भेटीसाठी मनूला अनुमती घ्यायची अजिबात गरज नाही. तिष्ठत दरवाजाबाहेर उभं राहण्याची तर अजिबातच गरज नाही. ती स्वत:ला राजकन्या समजते ना. ’’
नानासाहेब हसून म्हणाले, ‘ कबूल. कबूल. ’’
मनू एकदम प्रसन्नपणे हसली आणि सगळ्यांकडे पहात म्हणाली, ‘ तात्या, राजकन्या नाही, मी आता राणी होणार आहे.’’
रावसाहेब, तात्या आणि नानासाहेब एकदम एकाच स्वरात उद्गारले, ‘ काय? राणी? ’’ मनू गोड हसली आणि तिनं मान वेळावली.
तात्या तिला जरा समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘मनू, अग, तू स्वप्न पाहणं कधी सोडणार? ’’
मनू एकदम चिडलीच, ‘ काय? स्वप्न? तात्या, मी फक्त स्वप्नच पाहते का? आं? ’’
रावसाहेब म्हणाले,‘ अग बाई, तात्यांना म्हणायचं होतं की, आजपर्यंत तू स्वत:ला राजकन्या समजत होतीस आणि आता - - ’’
‘ आता राणी समजते आहे, असंच ना? ’’ रावसाहेबांचं वाक्य मनूनं पूर्ण केलं आणि ती हसत हसत गर्वानं म्हणाली, ‘ रावसाहेब, तात्या, नाना, मी खरंच राणी होणार आहे. झाशीची राणी. ’’
‘ म्हणजे? “गंगाधरराव नेवाळकरांची पत्नी? ’’ नानासाहेबांनी विचारलं.
मनूनं जोरात मान हलवत म्हटलं, ‘ हूंऽ. समजलं का तात्या? ’’
‘ हो, चांगलंच समजलं. झाशीच्या राणीला आमचा मुजरा.’’ तात्यांनी हसत लवून मुजरा करत म्हटलं.
मनू ताठ उभी झाली आणि म्हणाली, ‘ हूं. हे आता बरोबर आहे. ’’
मनू, रावसाहेब आणि तात्या हसले.
नानासाहेबांनी बाजूला वळून गणेशाच्या मूर्तीकडे पहात हात जोडले आणि देवाला प्रार्थना करीत थट्टा करण्याच्या स्वरात बोलले, ‘ हे परमेश्वरा, त्या झाशीच्या रहिवाशांचं रक्षण कर. ’’
‘ काय? ’’ मनूनं चमकून पहात विचारलं.
नानासाहेब बोलतच होते,‘ आमच्या इथली ही बिजली तिथे झाशीला जाणार आहे, तेही राणी होऊन. तेव्हा- - ’’ मनू चिडली, ‘ नाना मजाक नको. माझी थट्टा करू नका.’’
नानासाहेब गंभीर मुद्रा करण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, ‘ मनू मजाक नाही. मी खरंच देवाची प्रार्थना करतो आहे.’’
‘ ऊंऽऽ. ’’ मनू पाय आपटत फतकल मारून बसली, मला माहीत आहे. नाना तुम्ही आणि तात्या माझी नेहमी थट्टा करता. लहानपणापासून ओळखते मी तुम्हाला.
नानासाहेबांनी तात्यांकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसत तात्यांना ताकीद देत म्हटलं, ‘ तात्या, एका राणीची थट्टा करणं बरोबर नाही हं.’’
‘ नाना, मी जातेच कशी. ’’मनू रागावून जायला वळली. तिला अडवित रावसाहेब म्हणाले, दीदी, ते थट्टा करतात हे माहीत आहे तर तुम्ही चिडता कशाला? तुम्ही चिडता म्हणून ती दोघे चिडवतात. ’’
‘ हूंऽ.हे खरं आहे. मी आता मुळीच चिडणार नाही. कारण मी खरंच राणी होणार आहे. मी तुम्हाला सांगते रावसाहेब, उद्या लग्न होऊन मी ब्रह्मावर्त सोडून जाईन, तेव्हा यांना याचा इतका पश्चाताप होईल. बिलकूल करमणार नाही.’’
‘ हां. हे मात्र एकदम खरं हं. कारण त्यावेळी चिडवायला कोणीच राहणार नाही’’ तात्या बोलले.
नानासाहेबांनी होकारार्थी मान हलवित त्याला दुजोरा दिला, ‘ हूंऽऽ. बरोबर बोललात तात्या.’’
‘ अहो! मी खरच राणी होणार आहे. रावसाहेब तुम्ही तरी सांगा ह्या दोघांना.’’ मनूचा स्वर चांगलाच चढला.ते पाहून तात्या गंभीर होत म्हणाले, ’मनू आम्हाला खरंच असं वाटतं की तू राणी व्हावंस. परंतु फक्त राजाची राणी नाही, तर प्रजेचं रक्षण करणारी राणी हो. देवी अहिल्याबाईंसारखी राणी हो. ज्या राणीच्या राज्यात लोकांना योग्य न्याय मिळेल, सज्जनांना अभय असेल आणि दुष्टांना भय असेल अशी समर्थ राणी राणी हो.’’
नानासाहेब खूश होऊन म्हणाले, ‘ वाह! अगदी खरं बोललात तात्या.’’
‘ आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या राज्यात इंग्रजांना थारा देऊ नका. तुम्ही त्यांना आधारासाठी बोट पुढे केलं, की ते दंड पकडून तुम्हाला तुमच्याच राज्याबाहेर काढायला बघतील. ’’ तात्या बोलले.
नानासाहेबांची मुद्रा गंभीर झाली. ‘ तात्या, तुमच्या बोलण्याचा रोख कळतो आहे आम्हाला.’’
‘स्वामी!’’ एवढंच म्हणून तात्या थांबले. त्यांचा स्वरही गंभीर झाला होता. वातावरण गंभीर झालेलं पाहून मनू म्हणाली, ‘ तात्या, बस करा. अहो! मी आत्ताच सासरी जायला नाही निघाले. ’’
‘ हो! पण तिकडे गेल्यावर आम्हाला विसरू नकोस. लहानपणचे सवंगडी आहेात आपण.’’ रावसाहेबांनी मनूला आठवण करून दिली
‘ कमाल करता रावसाहेब. तुम्हा सर्वांना मी कशी विसरेन? गरज पडली तर देवाच्या आधी तुमचा धावा करीन. ’’
‘ आणि आम्हीही लगेच धावून येऊ .’’ नानासाहेबांनी झाशीच्या राणीला आश्वासन दिलं.
‘ बरोबर. अगदी पाताळात असलो तर पृथ्वीला भेदून वर येऊ आणि आकाशात असलो तर उतरून खाली येऊ.’’ तात्यांनी नानासाहेबांच्या आश्वासनाला जोड दिली.
‘‘वा! क्या बात कही !’’, रावसाहेबांनी हसून दाद दिली. सगळेच मनमोकळेपणाने हसले. वातावरण निवळलं. रावसाहेबांनी एक दीर्घ निश्वास टाकला.

Comments
Post a Comment