प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका
इकडे देवळात हे सर्व ऐकता ऐकता श्रोते स्तब्ध झाले होते. ज्या इंग्रजांच्या हातात पेशव्यांनी आपली रियासत सोपवली होती. ती रियासत परत न करता त्याच्या बदल्यात देणारा तनखा बंद करण्याच्या गोष्टी करीत होते. बोलता बोलता कीर्तनकार आळेकर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. हातातले टाळ धीमेपणानं वाजवित ते प्रश्नामागून प्रश्न उभे करत होते. माणूस इतका निष्ठूर असू शकतो? मागचं सगळं विसरू शकतो? उपकाराची फेड अपकारानं करू शकतो?
कीर्तन ऐकणार्या श्रोत्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
श्रोतेहो ! केवढा हा आघात? केवढा अपेक्षा भंग? ज्यांना आपलं आपलं म्हटलं, त्यांनी केवढा घात केला? नानासाहेब तर पार खचलेच. पण लगेच त्यांनी स्वत:ला सावरलं. या मानभंगातून उत्पन्न झालेल्या सूड भावनेनं उग्र रूप धारण केलं. नानासाहेबांनी इंग्रजांना उद्देशून एक खलिता तयार केला.
नानासाहेबांच्या जवळचा, इंग्रजी भाषा जाणणारा, त्यांचा एकनिष्ठ वकील अझिमुल्लाखान खलिता घेऊन विलायतेला रवाना झाला. श्रोतेहो, तुम्ही विचाराल, यालाच का पाठवलं? कारण नानासाहेबांच्या सर्व मसलतीत त्याचं फार वजन असे. तो आपली बाजू व्यवस्थित मांडेल या आशेनं नानासाहेबांनी अझिमुल्लाखानला विलायतेस पाठवलं. त्याने पूर्वी एका इंग्रजाच्या घरी खिदमतगारी करताना इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकून घेतल्या होत्या. अझिमुल्लाखान लंडन इथे आपलं गार्हाणं मांडायला गेले. उंचपुरी देहयष्टी, त्यावर भरजरी पोशाख, तेजस्वी, उमदा आणि मोहक चेहरा, मिठ्ठास वाणी यामुळे ब्रिटनच्या समुद्र किनारी या हिंदी राजाला पाहण्यासाठी गर्दी होत असे. याचवेळी हिंदुस्थानातील सातार्याचं गार्हाणं मांडण्यासाठी रंगो बापूजी नावाचे एक हुशार आणि कर्तबगार गृहस्थ आले होते. अझिमुल्लाखानने त्यांची भेट घेतली. आपल्या देशाचा सर्वनाश करू इच्छिणार्या इंग्रजांचा समाचार घेण्याच्या त्या दोघांनी शपथा घेतल्या.
कीर्तनकारांबरोबर तबला वाजवणार्यानं डग्यावर जोरदार थाप दिली.
आळेकरबुवा पुढे बोलू लागले, ‘काय सांगावे महाराजा, या सगळ्याचा उपयोग झाला?’
‘ झाला? ’’ एका श्रोत्याने उत्तेजित होऊन विचारलं.
अहो! दगडाच्या ह्रदयाला कधी पाझर फुटू शकतो का? बुवांनी डोळ्यातून येऊ पाहणारे अश्रू उपरण्यानं टिपले आणि ते पुढे बोलू लागले. अहो! ईस्ट इंडिया कंपनीनं नानासाहेबांच्या पत्राला साफ जबाब दिला,
’ गव्हर्नर जनरलने दिलेला निकाल आम्हाला सर्वस्वी पसंत आहे आणि म्हणून बाजीराव पेशव्यांच्या दत्तक पुत्राचा पेन्शनवर कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. इतकेच नव्हे तर ब्रह्मावर्ताकडील प्रदेशावर त्यांचा असणारा स्वतंत्र संस्थानिकत्वाचा हक्कही तुम्हास मिळणार नाही. आम्ही करतो हाच न्याय आहे.’
‘ अरेरे! ’’ सर्व श्रोत्यांनी दीर्घ निश्वास टाकले.
आळेकरबुवा महाराज सांगू लागले, निराश मनानं अझिमुल्लाखान फ्रान्स मार्गानं हिंदुस्थानकडे आला. कंपनी सरकारचा निरोप ऐकून नानासाहेब खूप संतापले. त्यांच्या तेजस्वी, चपळ, ऊग्र नेत्रांना असह्य मानभंगातून उत्पन्न झालेल्या सूडानं अधिकच उग्रता आणि तेजस्विता येऊ लागली. सगळ्यांच्या मनातली सूडाची भावना अधिकच तीव्र झाली.
तात्या त्यांना म्हणाले, ‘ स्वामी, निराश होऊ नका. हे आव्हान स्वीकारा. जे श्री शिवरायांना करावं लागलं, तेच महत्कार्य करण्याचं आपल्या वाट्याला आलं आहे. शत्रू वेगळा एवढंच. ’’
‘तात्या,अगदी खरं बोललात. आता जय येवो की अपजय येवो, आपण लढायचंच. मी एकतर स्वातंत्र्याचा नूतन शिवराज तरी ठरेन किंवा पहिल्या पेशव्यांना शोभेल असा शेवटचा पेशवा तरी ठरेन. ’’ नानासाहेब पेशवे आवेशाने बोलले.
‘ स्वामी, स्वराज्यप्राप्तीकरता जे क्रांतियुध्द करायचं, त्यासाठी दोन बाबी आवश्यक आहेत असं मला वाटतं. एक या देशातल्या सर्व राजांच्या आणि प्रजेच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याची अनिवार आणि तीव्र इच्छा निर्माण व्हायला हवी आणि दुसरं म्हणजे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशात एकाचवेळी उठाव होणं आवश्यक आहे. सगळ्यांमध्ये एकी हवी. आणखी एक, ही सर्व तयारी गुप्तपणे करायला हवी. शत्रूला जर या योजनेचा सुगावा लागला तर तो सगळा डाव काही क्षणात उधळून टाकू शकतो.’’ तात्यांच्या बोलण्यातला शब्द आणि शब्द नानासाहेबांना पटला.
ब्रह्मावर्ताच्या राजवाड्यात तर निराळेच वातावरण खेळू लागलं. एकेकाळी विजयानंदात डुलणारे जरिपटके धूळ खात पडले होते, ते पुन्हा उजळू लागले. ज्या दुंदुभीच्या आवाजाबरोबर लाखो मराठी समशेरी शत्रूंवर तुटून पडत असत ती पेशव्यांच्या वीररसानं दुमदुमणारी दुंदुंभी मध्यंतरीच्या काळात करुणरसाचे ध्वनी काढत होती, आता ती पुन्हा वीररसानं दुमदुमू लागली. जिच्या मुद्रणावर दिल्लीच्या सिंहासनातील घडामोडी अवलंबून असत ती देशव्यापी राजमुद्रा वाड्यात स्वत:च्याच वैधव्यावर शिक्का मारीत पडली होती, आता तीही उजळून निघाली. पेशव्यांच्या वाड्यात नवचैतन्य खेळू लागलं होतं.
नानासाहेबांनी आणि अझिमुल्लाखान यांनी मिळून मन:परिवर्तनाची योजना आखली. इंग्रज सरकार एकामागून एक संस्थानं खालसा करीत आहे, ही वस्तुस्थिती देशातल्या राजेरजवाड्यांकडे दरबारात मांडण्यासाठी प्रत्येकाकडे, याशिवाय वतनदार, जमीनदार आदी लेाकांकडे आपले पत्र देऊन दूत पाठवायला सुरुवात केली. दिल्लीपासून म्हैसूरपर्यंत सर्व राजधान्यांच्या ठिकाणी सर्वांकडे आपले दूत पाठवले. राजांपासून रंकांपर्यंत सर्वांच्या मनात देशप्रेम जागृत करण्यासाठी मौलवी, पंडित, संन्यासी देशात संचार करू लागले. त्यांनी उदात्त आत्मनिष्ठेची बीजं रयतेच्या अंत:करणात पेरली. नानासाहेबांनी दूतांना सांगितलं, ही जागृतीची बीजं फक्त देशातल्या पुरुषांच्या मनात रुजणं आवश्यक आहे असं नाही तर पुरुष बालकाला जन्म देणार्या स्त्रियांच्या मनातही देशाच्या स्वातंत्र्याची बीजं रुजायला हवीत. याशिवाय घरोघरी जाऊन औषधोपचार करणार्या बायकांच्या मनात देश स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली, तर त्या घरोघरी हा संदेश नेऊन पोचवू शकतील. याशिवाय गावागावत फिरून तमाशाचे कार्यक‘म करणार्या कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमातून मनोरंजनाबरोबर पारतंत्र्याविषयी तिटकारा उत्पन्न करून लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध क्षोभ वाढवावा.
अयोध्या, हा या देशातला अत्यंत सुपीक, विस्तृत क्षेत्र असलेला आणि संपन्न असा प्रदेश. राज्य. इंग्रजांचे लक्ष तिकडे गेलं. तिथल्या नबाबाने इंग्रजांना प्रेमाने धरायला बोट पुढे केलं तर त्यांनी त्याला जवळच ओढून घेतलं. इंग्रजांनी अयोध्येच्या सुपीक प्रदेशातला जमीनीचा एकएक तुकडा हस्तगत केला. आपलं सैन्य तिथे ठेवलं. त्याचा खर्च नबाबाला करायला लावला. नबाबाची तिजोरी रिकामी होते आहे असं लक्षात येताच अयोध्येचा एकेक भूभाग गिळंकृत करायला सुरूवात केली आणि शेवटी नबाबाला हलाखीच्या परिस्थितीला आणून ठेवले. वास्तवीक नानासाहेबांना पूर्वीच याचा अंदाज आला होता. त्यांनी लहान, मोठ्या संस्थानांच्या राजांना, तसंच जमीनदार, तालुकदार, वतनदार यांना पत्रं पाठवून उठाव करण्याचं सुचवलंहोतं. आपण सर्व हिंदुस्थानवासी एक झालो तर गोर्यासाहेबाचा निभाव लागणार नाही, हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
-आळेकरबुवांच्या आवाजाला एकदम धार आली. पण काय सांगावं? आपल्या देशातले संस्थानिक, राजे जागे होत नव्हते. पेशव्यांच्या पत्रांना प्रतिसाद देत नव्हते. बुवांचा कंठ दाटून आला. त्यांनी खेदानं म्हटलं म्हणा, पांडुरंग हरि वासुदेव हरि ,
श्रोतृवृंद जोरजोरात टाळ्या वाजवीत पण दुखा:नं म्हणू लागला, ‘ अरेऽअरेऽ,अरेऽ अरेऽ.’’
हार्मोनियमवरील सूरात जणू तेच वाजत होते. देवळातील गाभार्यात फक्त तेच स्वर घुमत होते.
काली नदीच्या काठी झालेल्या उठावात हिंदुस्थान्यांचा इंग्रजांनी पाडाव केला. त्यांनी त्या शिपायांना विचारलं, ‘आमच्याविरूध्द उठाव करण्याची तुमची हिंमत कशी झाली? ’’ गोर्यांच्या त्या प्रश्नातला उर्मटपणा सहन न होऊन शिपाई उत्तरले, ‘आम्ही सर्व हिंदुस्थानी शिपाई एक झालो तर गोरा चटणीलासुध्दा पुरणार नाही.’’
शिपायाच्या उत्तरानं गोरा चमकला. शिपायाच्या हातातील पत्र गोर्यांच्या हातात पडलं. त्यात लिहिलं होतं, ‘परक्यांना आपणच आपल्या उरावर चढवून घेत आहोत. जर आपण उठलो तर फिरंग्यांच्या मूठभर लोकांस तरवारीच्या एका झटक्यात गारद करून टाकू. कलकत्ता से पेशावरतक मैदान साफ है.’
त्यानंतर इंग्रज सरकारनं शिपायांच्या जवळील पत्रं फोडायला आरंभ केला. परंतु अयोध्येचं राज्य खालसा होईपर्यंत या आत्मनिष्ठेच्या बीजांना जोमदार अंकुर फुटले नाहीत.
+++++
ब्रह्मावर्तात नानासाहेब पेशवे गजाननाच्या मूर्तीसमोर डोळे मिटून, हात जोडून उभे होते. त्यांनी पाठवलेल्या पत्रांना काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते खूपच निराश झाले होते. त्यांचे औदासिन्य पाहून रावसाहेबही खिन्न मनानं त्यांच्या मागे उभे होते. तात्या आलेले कोणाच्या लक्षातही आले नाही. तात्या राजवाड्यात आले. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मागील एकेका तसबिरीसमोर उभं राहून त्यांनी प्रणाम केला. पहिल्या बाजीरावांच्या तलवारीवरून हात फिरवला, प्रणाम केला आणि ते पुढे आले. रावसाहेबांनी नजरेनंच त्यांना नानासाहेबांच्या औदासिन्याबद्दल खुणावलं आणि ते आत निघून गेले. आपल्या स्वामींकडे पहात तात्या ही निश्चल उभे होते. नानासाहेबांचा उदास चेहरा त्यांना पहावत नव्हता. त्यांना इतकं खचलेलं तात्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. तात्यांना वाटलं. राजाच खचला तर प्रजेनं कोणाकडे पहावं? विचार करत करत तात्या मागे फिरले आणि खिडकीजवळ जाऊन उभे राहिले. चाहूल लागून नानासाहेबांनी वळून पाहिलं. तात्यांकडे पहात ते म्हणाले,
‘ तात्या आपल्या पत्रांना एकानंही उत्तर दिलं नाही. ’’
तात्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ते शांत उभे होते. नानासाहेबांनी त्यांच्याकडे निरखून पाहिलं आणि विचारलं, ‘ तात्या, काही बोलायचंय आहे का? ’’
काही क्षण स्तब्धतेत गेले, नंतर तात्या एकेक शब्द उच्चारू लागले. ‘ स्वामी, एक योजना मनात घोळते आहे. आपली संमती असेल तर- - ’’
त्यांना अडवीत, नानासाहेब म्हणाले, ‘ तात्या, तुम्हाला संमतीची मागायची गरजच नाही. मनात असेल ते नि:संकोचपणे सांगा. काय योजना आहे ? ’’
‘स्वामी, राज्यांच्या राजेलोकांच्या, संस्थानिकांच्या, वतनदारांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आस्था नसेलही पण प्रजेला काय वाटतं? त्यांना देशाच्या स्वातंत्र्याची आस नक्कीच असेल असं वाटतं.’’ बोलता बोलता तात्या थांबले. नानासाहेब स्मित करीत उद्गारले,‘ तात्या, अहो! तुमची योजना ऐकायला आम्ही अधीर झालो आहोत. लवकर सांगा.’’
तात्या बोलू लागले, ‘ स्वामी, आपल्या या देशात ठिकठिकाणी लढवय्ये आहेत, आपण स्वार पाठवून त्यांच्या प्रमुखांकडे लाल कमळं पाठवायची. एका कमळाला एकशे आठ पाकळ्या असतात. सर्व लढवय्यांना रांगेत उभं करून पहिल्या लढवय्याच्या हातात ते कमळ द्यायचं. त्याला देशप्रेम असेल आणि तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार असेल तर त्यांनं कमळाची एक पाकळी तोडून आपली संमती व्यक्त करायची आणि ते कमळ पुढच्या लढवय्याच्या हातात द्यायचं. शेवटच्या व्यक्तीनं उरलेल्या पाकळ्यांसह किंवा नुसता कमळाचा दांडा प्रमुखाकडे द्यायचा. प्रत्येक प्रमुख ते दांडे आपल्या स्वाराकडे देईल. स्वार ते दांडे घेऊन परत आपल्याकडे येईल. कमळांच्या या दांड्यावरून किती लढवय्ये आपल्या पाठीशी आहेत त्याचा आपल्याला अंदाज येईल.’’
‘ उत्तम.’’ नानासाहेबांनी अभिमाननं तात्यांकडे पाहिलं. त्यांचे डोळे क्षणभर चकाकले.‘ तात्या, आम्हाला वाटतं, ताबडतोब तयारीला लागावं. ’’
तात्या क्षणभर स्तब्ध राहिले मग बोलले, ‘ स्वामी, कोणीसं म्हटलं आहे की, सैन्य पोटावर चालतात. या लढवय्यांच्या पोटापाण्याचीसोय करावी लागेल. त्यासाठी - - ’’
‘ तात्या त्याचीही योजना तुमच्या मनात तयार असेल. हो ना? ’’ नानासाहेबांनी बोलताबोलता मधेच थांबलेल्या तात्यांना विचारलं.
स्वामींनी आपल्या मनातलं अचूक ओळखलं, हे पाहून तात्यांनी एक निश्वास टाकला आणि ते सांगू लागले,
‘स्वामी, गावोगावच्या गावप्रमुखांकडे आपल्या स्वारांच्या हातून चपात्या पाठवायच्या. गावातल्या लोकांना, अगदी स्त्रियांनाही सांगायचं कारण चपात्या त्याच करणार ना? त्यांना कबूल असल्यास त्यांनी तेवढ्यचा चपात्या पुढच्या गावाकडे पाठवायच्या. यावरून किती गावातील किती लोक या आपल्या लढवय्यांच्या पोटापाण्याची सोय करू शकतील त्याचा अंदाज येईल. त्यानंतरच गोर्यांच्या विरोधात आपल्याला उठाव करता येईल.’’ तात्यांच्या प्रत्येक शब्दागणिक त्यांचं देशप्रेम त्यांच्या चेहर्यावरून उतू चाललेलं जाणवत होतं.
नानासाहेबांना तात्यांच्या चतुरस्त्रबुध्दीचं कौतुक वाटत होतं. प्रसन्नवदनाने ते म्हणाले, ‘तात्या आता उशीर कशाला? लगेच तयारीला लागा. ’’
पेशव्यांचे स्वार देशभरात सर्वत्र धावू लागले. हातातील लाल कमळं पलटणींच्या प्रमुखांकडे दिली जात होती. कमळाच्या बिया टाकलेल्या चपात्या गावोगावी पाठवल्या जात होत्या. कमळाच्या देठाचे दांडे परत येत होते. चपात्यंविषयीही ठिकठिकाणाहून माहिती येत होती. तात्यांच्या योजनेला अनुकूल प्रतिसाद मिळत होता. श्रीमंत पेशव्यांच्या चेहर्यावरचं हरवलेलं हसू परत येऊ लागलं होतं.
+ + + + +
-येवल्याच्या त्या देवळात आजही बरीच गर्दी झाली होती. आळेकरबुवाचं किर्तन दिवसेंदिवस रंगत असल्याचीच ही पावती होती म्हणाना-आळेकर बुवा टाळ वाजवू लागले. विठ्ठलनामाचा गजर करू लागले.
- पांडुरंग हरि वासुदेव हर । पांडुरंग हरि वासुदेव हर ।
म्हणा- विठ्ठ्ल विठ्ठल विठ्ठ्ल विठ्ठ्ल।महाराज डोलू लागले, श्रोतेही विठ्ठल विठ्ठ्ल म्हणता म्हणता एकतान झाले. इकडे ब्रह्ममावर्तात क्रांतिशक्तीचा अंदाज घेण्यात येत होता त्याचवेळी दिल्लीच्या दिवाण- इ - आम मध्ये क्रांतिशक्ती संघटित करण्याचे प्रयत्न सुरू होते. या लोकजागृतीला उभार देण्यासाठी निरनिराळे उपाय योजले जात होते आणि हिंदुस्थान देशात क्रांतीच्या ज्वाळा पेटू लागल्या.
तात्यांनी श्रीमंतांना सुचवलं, ‘स्वामी, जिकडे तिकडे मन:परिवर्तनाची लाट उसळून येत आहे. तेव्हा आपण सर्व केंद्रांना सूत्रबध्द करण्यासाठी आणि देशातील गुप्त संघटनांची एकवाक्यता करण्यासाठी त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्यात असं वाटतं.”
बुवा सांगू लागले, तात्यांची सूचना नानासाहेबांना एकदम पटली. अठराशे सत्तावनच्या एप्रील मध्ये श्रीमंतांची स्वारी आपले बंधू बाळासाहेब आणि मंत्री अझिमुल्लाखान यांना घेऊन दिल्लीकडे गेले. दिल्लीची सर्व तयारी पाहून नानासाहेब पेशवे लखनौकडे निघाले. तिथे त्यांनी तिथले कमिश्नर सर हेन्री यांची भेट घेतलीआणि आपण लखनौ शहर पाहण्यासाठी आलो आहोत, असं सांगितलं.
त्याचदिवशी सकाळी लखनौचा चीफ कमिश्नर सर हेन्री लॉरेन्स ह्याच्या बग्गीच्या मागे तेथील देशवासी धावले आणि त्यांनी त्याच्या अंगावर चिखलाचे गोळे फेकले. त्यानंतर लवकरच पेशव्यांचं तिथे आगमन झालं. त्यांना पाहताच लोकांच्या उत्साहाला उधाण आलं. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची त्यांनी जंगी मिरवणूक काढली. तिथल्या जनतेच्या मनाचा नानासाहेबांना अंदाज आला. दिल्ली, लखनौ, काल्पी आणि त्यानंतर त्यांनी जगदीशपूरच्या कुंवरसिंगची भेट घेतली. नानासाहेबांनी मुख्य पुढार्यांच्या भेटी घेतल्या आणि पुढच्या क्रांतीचा नकाशा रेखाटून श्रीमंत ब्रह्मावर्तात परत आले. आतून धुमसणार्या या ज्वालामुखीची धूर्त राज्यकर्त्या इंग्रजांना अजिबात कल्पना आली नाही. तात्यांच्या सांगण्यानुसार पेशव्यांनी उठावाची सर्वत्र एकच तारीख ठरवावी असा आग्रह धरला आणि त्यानुसार ३१ मे ही तारीख निश्चित करण्यात आली. बोलता बोलता बुवांचा आवाज गंभीर झाला. ते म्हणाले, याच सुमाराला बंगालमध्ये एक घटना घडली.
-विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, आळेकरबुवांनी विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. श्रोत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
एका श्रोत्यानं विचारलं, ‘ महाराज, काय घडलं बंगालमध्ये? ’’
‘हो. हो. कोणती घटना? सांगा महाराज? ’’ इतर श्रोत्यांनीही एकसुरात विचारलं. बुवांनी हातातल्या झांजांचा झंकार केला आणि म्हणाले, श्रोतेहो, आता दिवेलागणीची वेळ झाली आहे. दोन वाक्यात त्या घटनेचं वर्णन करता येणार नाही, तेव्हा आपण उद्याच्या दिवशी बंगालच्या त्या घटनेबद्दल पाहू. श्रोत्यांची उत्सुकता फारच ताणली गेली.
‘महाराज, अंधार झाला तरी चालेल, पण तुम्ही कीर्तन थांबवू नका. बंगालची ती घटना सांगाच.’’ एक श्रोता म्हणाला, इतर त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत बोलले, ‘ हो. अगदी मध्यरात्र झाली तरी चालेल पण ती घटना ऐकल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आळेकर बुवांनी स्मित केलं. खाली ठेवलेले टाळ हातात घेतले आणि टाळ वाजवीत त्यांनी विठ्ठलनामाचा गजर सुरू केला. श्रोतेही त्यात सहभागी झाले. थांबलेला हार्मोनियम वाजू लागला, तबल्यानेही ताल धराला.
कीर्तन पुढे सुरू झालं. ‘तर काय सांगावं महाराजा ! बंगालमध्ये इंग्रज सरकारच्या तैनातीत आपल्या देशवासीयांचं बरंच सैन्य होतं. या शिपायांना इंग्रज सरकारनं नवी काडतुसं दिली होती. या काडतुसांचं आवरण शिपायांना दातांनी तोडावं लागे. त्यांना एका व्यक्तीकडून कळलं की, या नव्या काडतुसांना गायींच्या, डुकरांच्या मांसाची चरबी लावलेली आहे. शिपायांना कळलं मात्र, त्यांनी काडतुसांचं आवरण दातांनी काढायला नकार दिला पण इंग्रज अधिकार्यांनी शिपायांवर बळजोरी करायला सुरूवात केली. ते त्यांना धाकदपटशा दाखवायला लागले. शिपाई चिडलेले होते.त्यांनी उग्र रूप धारण केलं. हे पाहून इंग्रजांनी ब्रह्मदेशातील गोर्यांची पलटण बोलावली. एकोणिसाव्या देशी पलटणीतील शिपायांना नि:शस्त्र करून कामावरून दूर करण्याचा हुकूम झाला. बराकपूर इथे सर्व देशी शिपायांच्या डोळ्यादेखत त्या नि:शस्त्र शिपायांना शिक्षा देण्यात येणार होती. बराकपूरहून सर्व स्वातंत्र्याभिमान्यानी सांकेतिक पत्रं पाठवून उठावासाठी कोणता दिवस मुक‘र करावा? याबाबत विचारणा केली. पण मंगल पांडे या शिपायाच्या तलवारीला म्यानात धीर धरवेना. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या स्वदेश बंधूंचा अपमान होणार, ही गोष्ट मंगल पांडेच्या मनाला असह्य वेदना देत होती. त्यानं अस्वस्थ मनानं आपली बंदूक उचलली आणि परेडच्या मैदानात उडी घेतली. ‘ भाईंयो! उठो चलो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या शत्रूवर तुटून पडा. ’’ हे पाहताच, सार्जंट ह्यूरोजनं मंगल पांडेला पकडण्याचा हुकूम दिला, पण एकही शिपाई जागेवरून हलला नाही. याउलट मंगल पांडेच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि तिनं त्याला पकडण्याचा हुकूम देणार्या ह्यूरोजचा जीव घेतला. इतक्यात लेफ्टनंट बॉ घोड्यावरून तिकडे धावला. मंगल पांडेच्या बंदुकीतून दुसरी गोळी सुटली आणि लेफ्टनंट बॉचा घोडा धाडकन् खाली पडला. लेफ्टनंट बॉ हातातील पिस्तुल धरून लगेच उभा राहिला.तो मंगल पांडेला गोळी मारणार तोच मंगल पांडे वार्याच्या वेगानं पुढे आला आणि त्यानं बॉ वर तलवारीनं वार केला. लेफ्टनंट बॉ जमिनीवर लोळू लागला. इतक्यात एक गोरा शिपाई मंगल पांडेच्या दिशेनं येताना एका देशी शिपायाला दिसला. त्या शिपायानं त्या गोर्या शिपायाच्या डोक्यावर बंदुकीच्या दस्त्याचा रट्टा दिला. तो गोरा शिपाई खाली पडला. कर्नल व्हीलर पुढे आला, त्यानंतर पुन्हा मंगल पांडेला पकडण्याचा हुकूम दिला गेला. पण त्याचवेळी सर्व देशी शिपायांनी एकसुरात गर्जना केली. ‘आम्ही त्याच्या केसालाही हात लावणार नाही”. गोर्यांच्या रक्ताचे पाट वहात आहेत ते न पाहवून कर्नल व्हीलरच रक्त खवळलं होतं पण एकंदर परिस्थितीचा विचार केला आणि त्यानं स्वत:च्या मनाला आवर घालून तो आत निघून गेला.
आपली रक्तानं भरलेली तलवार उंच करून मंगल पांडे इकडे तिकडे दौडत गर्जना करीत होता, ‘ मर्दांनो उठा ! मर्द हो उठो! ’’ जनरल हीर्सेला हे कळताच तो गोर्या शिपायांची तुकडी घेऊन आला. ते मंगल पांडेचा पाठलाग करू लागले. आपण शत्रूच्या हातात सापडणार असं वाटताच मंगल पांडेनं स्वता:वर गोळी झाडून घेतली आणि हिंदुस्थानचा तो देशभक्त शिपाई जखमी होऊन धरतीवर पडला. पण लगेच गोरे पुढे धावले, त्यांनी त्याला इस्पितळात भरती केलं. त्याला वाचवण्यात आलं.
त्यानंतर त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या वीराची कोर्ट मार्शलपुढे चौकशी झाली. या चौकशीत त्यानं इतरांची नावं सांगावी म्हणून प्रयत्न करण्यात आला, पण त्या तेजस्वी तरुणानं स्पष्ट नकार दिला. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि आठ एप्रिल रोजी त्या वीराला फाशी देण्याचं ठरलं.
बोलता बोलता आळेकरबुवांचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले. श्रोत्यांमध्ये पुरुषांचे रुमाल आणि बायकांचे पदर अश्रूंनी भिजले होते. श्रोते जायला उठले तेवढ्यात वुवा बोलू लागले, ऐका, बराकपूर शहरात मंगल पांडे यांना फाशी द्यायला एकही मारेकरी मिळेना, तेव्हा कलकत्त्याहून चार मारेकरी इंग्रजांनी आणले, मंगल पांडेला फाशी दिलं, एक तेजस्वी ज्योत मालवली, परंतु अनेक ज्योती पेटवूनच!
बुवांनी डोळे पुसत टाळ खाली ठेवले.हार्मोनियमचा गंभीर स्वर देवळातल्या घुमटात घुमत होता. श्रोते उठले आणि जड अंत:करणानं घराकडे गेले.
+++++
दुसरे दिवशी देवळातील गर्दी खूपच वाढली. श्रोते दाटीवाटीनं बसले होते. आळेकरबुवांनी झांजा वाजवून विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. विठ्ठ्ल, विठ्ठल, विठ्ठल.
हार्मोनियम वाजू लागली. तबल्यानं ताल धरला. श्रोतेही नामस्मरणात रंगले.
होऽऽ !बुवा बोलू लागले, मंगल पांडेचं रक्त बंगालमध्ये सांडलं परंतु तिथे त्याच्या रक्तातून जे स्वातंत्र्याचं बीज रुजलं त्याला हिंदुस्थान देशात ठिकठिकाणी अंकुर फुटले. अंबाला इथे इंग्रजांच्या सेनेचं स्थान होतं. कोणी इंग्रज अधिकारी विरोधात्मक बोलू लागले तर देशी शिपाई त्यांची घरं पेटवून देत. मीरत इथे इंग्रजांनी पुन्हा देशी शिपायांना काडतुसांची आवरणं दातांनी तोडण्याचा आग्रह धरला. शिपायांनी नकार दिला. तेव्हा त्या सर्वांना कोर्ट मार्शलपुढे उभं करून सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.
आळेकरबुवांनी झांज वाजवली. डोळे मिटले आणि ते पुढे बोलू लागले, ‘९ मेला एक शोककारी प्रसंग घडला. इंग्रजांनी तोफांच्या पहार्यात या ८५ शिपायांना उभं केलं. त्यांना कपडे उतरावयाला सांगून त्यांच्या पायात आणि हातात लोखंडी बेड्या ठोकल्या आणि सक्तमजुरीची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कारागृहात नेलं.
ते सर्व पाहण्यासाठी देशी शिपायांना मुद्दाम बोलावून आणलेलं होतं. हे पाहणारे शिपाई पुढे बाजारात गेले असता तिथे बायका त्यांना तिरस्कारानं म्हणू लागल्या, ’तुमचे सहकारी तिथे तुरूंगात हाल सोसत असताना तुम्ही इथे माशा मारत फिरता आहात? काय म्हणावं तुम्हाला? थू आपकी जिंदगीपर !’ देशी शिपाई विचारात पडले. ३१ मेपर्यंत थांबायचं कसं? एकेक दिवस घालवणं, कठीण होत आहे. शेवटी त्या शिपायांच्या म्होरक्यांनी दिल्लीला निरोप पाठवला
‘ आम्ही ११ किंवा १२ मेला दिल्लीत पोचत आहोत. ’’
आळेकरबुवांनी श्रोत्यांकडे एकदा पाहिलं आणि ते पुढे म्हणाले, काय सांगावं महाराजा, १० मेला रविवारच्या दिवशी मीरत इथे, इंग्रज नीटनेटक्या पोषाखात हसत हसत आपल्या कुटुंबियांसह चर्चमध्ये जाण्यासाठी निघाले आणि मीरतच्या पायदळातील सैनिकांनी आणि घोडेस्वरांनी तलवारी उपसत ललकारी दिली, ‘मारो फिरंगी को ! हर हर महादेव !’ मीरतच्या चर्चच्या घंटा वाजू लागल्या. प्रार्थनेसाठी वाजणार्या घंटा मृत्यूची सूचना देत होत्या.
‘‘शाब्बास.’’ श्रोत्यांपैकी एकजण न राहवून ओरडला. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायला सुरूवात करून दाद दिली. आळेकर बुवा बोलतच होते, ‘मीरतच्या आजूबाजूच्या गावांमधून हाताला येईल ते शस्त्र घेऊन हजारो लोक मदतीला धावले. सर्व सैन्य कारागृहाकडे झेपावलं. कैद केलेल्या शिपायांच्या बेड्या तोडून त्यांना मुक्त केलं. कर्नल फिनीस शिपायांना धाक दाखवू लागताच त्याच्यावर शिपाई चवताळून धावले. जिथेजिथे गोरा दिसला त्याला तिथेच गारद केलं. गोर्यांना पळता भुई थोडी झाली. कोणी तबेल्यात लपले, तर कोणी जमिनीतल्या खड्डयात, तर कोणी शेतकर्याचं सोंग घेऊन जीव वाचवू पहात होते. काहींनी बटलराचे पाय धरायलाही मागेपुढे पाहिलं नाही. चवताळलेले लोक दिल्लीच्या दिशेनं निघाले,’‘चलो दिल्ली ! चलो दिल्ली ! ’’ हा एकच जयघोष घुमत होता.

Comments
Post a Comment