प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान
प्रजातंत्राचा प्रणेता-तात्या टोपे
(ऐतिहासिक कादंबरी)
लेखिका- सौ.पुष्पा काणे
येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान
महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील पलोद परगण्यातील येवले गाव. तसं लहानसंच. तिथल्या लोकांनी तिथे नदीच्या काठी एक सुंदर गणपतीचं देऊळ बांधलं. नक्षीदार खांब. त्यावर लाल जास्वंदीच्या फुलांची आणि हिरव्याकंच पानांची वेलबुट्टी कोरलेली. कलाकुसर करण्यात तिथले लोक कुशलच. रेशमी लुगड्याला जरीचे काठ आणि जरीचा पदर. त्यावर कला कुसर, पदरावरचे मोर तर पाहणार्याला फारच आकर्षित करतात. कोणीतरी त्याला नाव दिलं पैठणी. देवळाच्या आत गाभार्यात दर्शनासाठी येणार्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हात वर करून बसलेली गणपतीची भव्य आठ फूट ऊंच मूर्ती. गणपती म्हणजे पेशव्याचं आराध्य दैवत. आजही संकष्टी चतुर्थीला तिथे दर्शनासाठी येणार्यांची रीघ लागते. येवल्याच्या गणपतीला नेवेद्य असतो, अनारशाचा.
गाभार्यासमोर अंगणात तात्या टोपे यांचा घोड्यावर बसलेला पुतळा गावात नव्याने बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या गाभार्यात सुप्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. आळेकरबुवा महाराज आज आले होते. त्यांचं रसाळ कीर्तन ऐकायला गावातल्या लोकांनी गर्दी केली होती. ठरलेल्या वेळी ज्ञानेश्वरीतील ओव्या गाऊन त्यांनी श्रीगणेशाला वंदन करून कीर्तनाला सुरूवात केली. हार्मोनियमवर काळी पाचचा षडज लावला गेला. सूर घुमू लागला. बुवांनी सूर धरला आणि ते भक्तिभावाने गाऊ लागले.--
ॐ
आत्मरूप गणेशु स्मरण !
सकळ विद्यांचे अधिकरण !
तेचि वंदूचरण ! श्रीगुरूचे !!
जयाचेनि आठवे !
शब्दसृष्टी आंगवे !
सारस्वत आघवे !जिव्हेसि ये !!
वक्तृत्व गोडपणे !
अमृताते पारु म्हणे !
रस होती वोळगणे ! अक्षरांसी !!
श्री गुरूचे पाय !
जै गिंवसूनी ठाय!
तै येवढे भाग्य होय ! उन्मेषासी !!
बुवा थांबले. अर्थ उलगडून सांगत त्यांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- - सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेश त्याच स्मरण तेच श्रीगुरूंचे चरण होत. त्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टि स्वाधीन होते. शब्दांवर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी सांगण्याचे सामर्थ्य येते. आपल्या गोडपणाने वक्तृत्व अमृताला पलिकडे सर, बाजूला हो, असे म्हणते. नवरस वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. त्या श्री गुरूंच्या चरणांना मनोमन स्पर्श करून आजच्या कीर्तनाकडे वळू या. बोला,
सद्गुरू महाराज की जय ! श्री ज्ञानदेव तुकाराम!
सर्वांनी म्हणा- राम राम, सीताराम सीताराम!
सर्व श्रोते म्हणू लागले, ‘ राम राम, सीताराम सीताराम! ’’ हातातले टाळ वाजवित आळेकर महाराज डोलत होते. रामाचे नामस्मरण करता करता सर्व श्रोते एकतान झाले. एकचित्त झाले. असं पाहून महाराजांनी कीर्तनाच्या पूर्व रंगाला सुरूवात केली.
होऽ!, रसिक श्रोतेहो, आपला हा भारत देश कोणे एकेकाळी अत्यंत संपन्न आणि प्रगत देश होता. इथली माती इतकी सुपीक होती आणि इथल्या प्रगत लोकांनी शेतीशास्त्राचा अभ्यास करून, अनेक प्रकारची धान्यं, विविध प्रकारची फळं पिकवली. यात मुख्य पीक कापसाचे आणि अफूचे. अफूची निर्यात होत असे. लोक कापसापासून सूत काढत. त्यामुळे विणकरांचा कापड विणण्याचा उद्योग खूप जोरात चालत असे. हातमागावर लोक वेगवेगळ्या रंगाची वस्त्रं तयार करीत आणि म्हणूनच की काय परकीयांच्या डोळ्यात हे खुपू लागले आणि काय सांगावे महाराजा, ही सर्व संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून परकीयांनी या देशावर वारंवार आक्रमणं केली. कीर्तन करता करता बुवा गाऊ लागले. पेटीवर सूर दिला गेला.
हरबोले संन्यासी, धन बिदेस चली जात है, दु:ख भारी होय!
अहो, काय सांगावं ? या देशतील धन विदेशात जात आहे ह्याचं फार दु:ख होत आहे.
‘ म्हणा- राम राम, सीताराम सीताराम !’’ कीर्तनकार अाळेकरबुवांबरोबर प्रेक्षकही म्हणू लागले. ‘राम राम, सीताराम सीताराम’ देवळाच्या गाभार्यात रामाच्या नामस्मरणाचा आवाज घुमू लागला. तबला साथ देत होता. टाळ वाजू लागले. सगळे श्रोते तल्लीन झाले. इतक्यात बुवांनी त्यांना थांबवले.
होऽ! हात वर करून ते म्हणाले, परकीय आले इथेच बस्तान बसवून राज्य करू लागले.
परकीयांच्या या अशा आक्रमणाने एक मराठी स्त्री अस्वस्थ झाली, तिने आपल्या मुलाला स्वराज्याचं महत्त्व पटवलं. त्याला युध्दाचं शिक्षण दिलं. आपल्या सवंगड्यांसह ते बालक ताठपणे उभं झालं. हे बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
स्वदेशासाठी, स्वराज्यहितासाठी, स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवरायांनी तलवार उपसली. मावळ्यांचं सैन्य जमवलं. आक्रमण करून परकीयांच्या हातातली जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.
संत रामदास स्वामी म्हणतात- -
शिवरायांचे आठवावे रूप!
शिवरायांचा आठवावा प्रताप!
शिवरायांचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी !!
शिवराय प्रदेश जिंकत गेले. त्या त्या प्रदेशाचा कारभार एकेकाकडे सोपवत गेले. बाळाजी विश्वनाथ यांचं चातुर्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना प्रधानपद दिलं. पेशवेपद दिलं. या पेशव्यांचं वास्तव्य पुण्याला. शूर बाळाजीपंतांनी आणि बाजीराव पेशव्यांनी दिल्लीच्या तक्ताला हादरे दिले. पेशव्यांच्या वंशजांनी अटकेपार झेंडे फडकवले. काय सांगू मंडळी, सदाशिवरावभाऊ, राघोबा, विश्वासराव, बाजीराव यांचा पराक्रम काय वर्णावा? अहाहा ! आठवण झाली तरी अंगावर रोमांच उभे राहतात.
पण हाय रे दैवा! दैव फिरले की माणसाची बुध्दीही फिरते.
दुसर्या बाजीराव पेशव्यांनी आपली पुण्याची मराठ्यांची सत्ता सरळसरळ इंग्रजांच्या हाती सोपवली आणि कानपूरजवळ भागीरथीच्या तीरावर बिठूर किंवा ब्रह्मावर्त इथे येऊन राहू लागले. ब्रह्मावर्त हे एक लहानसं, ऐटदार शहर. शहराजवळच भागीरथीचं प्रशस्त पात्र. भागीरथी नदीच्या काठावर सुंदर घाट, नाना रचनेची देवालयं बांधलेली होती. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा वाडा फारच विस्तीर्ण आणि उत्तम सामग्रीने सुशोभित केलेला होता. इंग्रजांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना त्यांच्या राज्याच्या बदल्यात दरमहा आठ लक्ष रूपये तनखा देण्याचं कबूल केलं होतं. त्यावेळी पुण्याहून त्यांच्याबरोबर अनेक कुटुंबं बिठूर इथे आली. त्यांच्याबरोबर आलेल्या कुटुंबांपैकी माधव नारायण आणि गंगाबाई या जोडप्याच्या पुत्राला बाजीरावांनी दत्तक घेतलं. हेच नानासाहेब पेशवे. पांडुरंग येवलेकर हे मुदपाकखान्याचे प्रमुख होते. त्यांना एकूण आठ मुलं त्यातील दुसरा मोठा मुलगा रामचंद्र उपाख्य रघुनाथ. लहान भावंडं त्याला तात्या म्हणत. दुसर्या बाजीरावांच्या निधनानंतर नानासाहेब पेशवेपदी विराजमान झाले.
नानासाहेबांनी आपल्या मंडळात तात्या, ज्वालाप्रसाद आणि अझिमुल्लाखान यांना सामील करून घेतलं. तात्या, नानासाहेबांचा बालमित्र. नानासाहेबांबरोबर युद्धाचं शिक्षण घेतलेला. निष्ठावंत. श्रोतेहो! इथं देवळाच्या बाहेर बघा. त्या तात्यांचा घोड्यावर बसलेला पुतळा उभारलेला आहे. तात्यांचा घोडा अडीच घरं चालायचा. स्मित करीत बुवा म्हणाले, तात्यांच्या येण्याचा, मुक्कामाचा इंग्रजांना कधी अंदाजच करता आला नाही.
श्रोतेहो! आज आपण तात्या टोपे यांचंच आख्यान लावणार आहोत. मराठी माणसाच्या पराक्रमाचं, चातुर्यांचं आणि स्वामीनिष्ठेचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तात्या टोपे. टोपे हे आडनाव जरा वेगळंच वाटतं नाही का? अहो! त्यांचं आडनाव येवल्याचे रहिवासी म्हणून येवलेकर, भट किंवा कुळकर्णी असावं असं म्हणतात. लहानपणी तात्यांचं युध्द कौशल्य पाहून त्यांना दुसर्या बाजीराव पेशव्यांनी रत्नजडित टोपी दिली, म्हणून त्यांना टोपे म्हणू लागले.1857 च्या युध्दामधील तात्यांचा पराक्रम ऐकून पुढे त्यांच्या नातेवाईकांनी टोपे हेच आडनाव घेतले.

Comments
Post a Comment