प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.
प्रजातंत्राचा प्रणेता. प्रकरण ७ वे ‘इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.
इकडे देवळात कीर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्यांना आळेकर बुवा सांगत होते.‘अहो! शिपायांना पेशव्यांचं म्हणणं पटलं. त्यांचं सैन्य कानपूरकडे परत चालू लागलं. तिथे पोचल्यावर तात्यांनी शिपायां कडून रोज कवायती करून घ्यायला सुरुवात केली. शिपायांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम तात्या करीत होते. अहो! म्यानात राहून पडल्यामुळे तलवारी गंजतात, तसच सैन्याचही आहे. कवायतींशिवाय शिपाईही आळशी होऊ लागतात. निस्तेज होऊ शकतात, असं तात्यांचं मत होतं. नानासाहेब मात्र थोडे उदास होते? खचले होते का? नाही हो, उठावाची तारीख ठरली होती, पण त्यापूर्वी आपले शिपाई इतक्या कमी वेळात तयारी करू शकतील का, याची नानासाहेबांना काळजी वाटत होती. आपल्या प्रजेची काळजी वाटत होती. वाड्यात त्यांनी अथर्वशीर्षाचं पठण सुरू केलं. गणपतीसमोर बसून नानासाहेब गणपतीराजाला आवाहन करत होते. विनवीत होते, ’हे गणराया, माझ्या प्रजेचं रक्षण कर. हे विघ्नहर्त्या, पारतंत्र्याशी मुकाबला करण्याचं आम्हाला सामर्थ्य दे.’ तिकडे कानपुरात काही जागी धुसपूस सुरू होती. अझिमुल्ला आणि सहकारी मात्र नाराज होते. कुठेतरी आग धुमसत होती.
एक दिवस अझिमुल्ला हातात तरवार घेऊन नानासाहेबांसमोर उभा झाला. तो खूप चिडलेला होता.
‘ स्वामी, हम मानते है की तात्या आपका बचपन का दोस्त है, लेकिन आप उसे समझाईये. हां. ’’
नानासाहेबांनी विचारलं, ’शांत व्हा, शांत व्हा. झालं काय? काय झालं अझिमुल्ला? ’’
‘ ये तात्या आमच्या कामामधे अडंगा डाल रहा है. ’’
नानासाहेबांनी प्रश्नार्थक मुद्रेने तात्यांकडे पाहिलं.
तात्या शांतपणे बोलू लागले, ‘स्वामी,आपण इथे पूजापाठ करण्यात मग्न आहात आणि तिकडे कानपूर मध्ये काय चाललं आहे माहित आहे? कत्तल. ’’
‘ काय? कत्तल? कोणाची? ’’
तात्या पुढे बोलत होते, ‘ तिकडे इस्पितळात असलेल्या जखमी इंग्रजांवर, त्यांच्या बायकामुलांवर तोफा डागल्या जात आहेत. ’’
नाना आश्चर्यानं उद्गारले, ’काय? तोफा डागल्या जात आहेत? का? अझिमुल्ला ? ’’
‘ वह हमारे शत्रू है. अंग्रेज इस धरतीपर आक्रमण कर रहे है, हमारा राज्य छीन रहे है.
तात्या उपरोधिकपणे म्हणाले, ‘हे तर तुमच्या बाबतीतही म्हणता येईल. ’’
‘ तात्या, पुरानी बाते क्यों उखाडते हो. वह इतिहास हुआ. ’’ अझिमुल्ला उत्तरला.
त्यांचा वाद थांववत नानासाहेबांनी विचारलं, ‘अझिमुल्ला, मला हे सांगा इस्पितळात भरती असलेल्या, दवापणी घेत असलेल्या इंग्रजांचा राजनीतीशी काय संबंध ? ’’
‘ संबंध है, स्वामी, संबंधहै. वह अंग्रेज है. और अंग्रेज हमारे शत्रू है. ’’
‘ पण- - ’’
तात्यांना बोलू न देता नानासाहेबांनी त्यांनाच प्रश्न केला, ‘ तात्या इस्पितळाचे पहारेकरी काय करीत होते? ’’
तात्या सांगू लागले, ‘या अझिजानने त्यांना तिथून जाण्याचा हुकूम दिला. आणि मग काय?- - त्या सुंदर स्त्रिचं काळीज असं पत्थर असेल असं वाटलं नव्हतं. मला म्हणते कशी, तात्या, खरंच बहादूर असाल तर पुढे येऊन आपली बहादुरी दाखवा. हाच वखत आहे.’’ अझिमुल्लाखानकडे रोखून पहात तात्या पुढे म्हणाले, ‘स्वामी, निरपराध, नि:शस्त्र लोकांना मारणं यातच यांना शूरपणा वाटतो. ’’
अझिमुल्लाखान चिडला. म्हणाला, ‘तात्या ! देखो ! यह तलवार मेरे हाथ की- - -देखते हो ना? ’’
तात्यांनी त्याच्याकडे पहात विचारलं, ’मला धमकी देता? ज्या माझ्याजवळ तलवार आहे, त्या मला धमकी? एक लक्षात ठेवा, माझी तलवार अजून म्यान आहे म्हणून, नाहीतर - - ’’
‘ देखो, चोबीस घंटो मे कानपूर के हर अंग्रेज को मुर्दा कर सकता हूं. ’’ तात्यांकडे तीक्ष्णपणे पहात अझिमुल्ला खान बोलला.
तात्यांनी सरळच विचारलं,‘ अझिमुल्लाखान नि:शस्त्र लोकांवर तोफा डागण्यात कुठली बहादूरी? समजा हे ऐकून उद्या इंग्रज फौज घेऊन आले आणि त्यांनी हल्ला केला तर? मग तर पळून जाल. ’’
अझिमुल्ला त्वेषाने म्हणाला, ‘ झूठ, बिल्कुल झूठ.’’
तात्या शांतपणे समजावण्याच्या स्वरात म्हणाले, ‘अझिमुल्ला, जरा सत्यस्थिती जाणून घ्या. तुमच्या सैनिकांनी कितीतरी दिवसात कवायत केलेली नाही. सेनापती कोण हे त्यांना माहीत नाही. एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही. ज्याच्या मनात जे येईल तो ते करतो आहे. हा काय न्याय झाला? काही नियम हवा का नको? मला सांगा आपल्या सैनिकांजवळ कोणती आणि किती शस्त्रं आहेत, त्यातली किती चालताहेत, याचा तुमच्या जवळ हिशोब आहे? इंग्रजांनी हल्ला केला तर पुढे कानपूरच्या संरक्षणाची तुमच्याकडे काय योजना आहे? ’’
अझिमुल्ला जोरात हसला, ‘बहोत खूब ! बहोत खूब! तात्या, आप तो ऐसे - जैसे - ’’
नानासाहेबांचा संयम संपला, दोघांना थांबवत ते म्हणाले. ‘ बस, बस. बस करा! हे पहा अझिमुल्ला आता कानपूरमधल्या इस्पितळातल्या इंग्रजांवर कोणीही हमला करणार नाही. अझिजजानलाही आमचा आदेश सांगा, आता तिथे एकही तोफ डागली जाणार नाही. बंदूक चालवली जाणार नाही.नाहीतर- - नाहीतर आपलंच युद्ध होईल. आधी तुम्ही तुमच्या सैन्याबाबतची सत्य परिस्थिती जाणून घ्या. हे सर्व लक्षात ठेवूनच पाऊल उचला आणि आता या. ’’
‘ लेकिन, स्वामी - - ’’
नानासाहेब कडक स्वरात म्हणाले, ‘आपण या. हा आमचा हुकूम आहे आणि हुकुमाची तामिली व्हायलाच हवी.’’
अझिमुल्लाने मुजरा करत म्हटलं, ‘ जी. जैसी आपकी मर्जी. आपके हुकूम की तामिल होगी.’’’
जाता जाता तात्यांकडे कटाक्ष टाकून स्वत:शीच पण मोठ्या आवाजातच म्हणाला, ’मै तुम्हे देख लूंगा. देख लूंगा तात्या.- - ’ बोलत बोलत बाहेर निघून गेला.
तात्या गालातल्या गालात हसले आणि त्यांनी मान झटकली, ‘ स्वामी! रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू? ’’ नानासाहेबांनी हाताने सांगा अशी खूण केली. ‘स्वामी!आपलं आपसात युद्ध होईल असं आपण अझिमुल्लाखानला म्हणालात, पण आपली सेना आहेच कुठे? सगळे सैनिक त्यांच्याच सैन्यातले आहेत. ’’
हे लक्षात येऊन नानासाहेब अस्वस्थ झाले. विचारात पडले. ‘ तात्या, काहीही करा पण इस्पितळातल्या त्या इंग्रजांना यांच्या हातून सोडवा आणि सुखरूप पाठवून द्या. इंग्रज नक्कीच चिडतील आणि मग - तात्या, हे तुम्हीच करू शकता. आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. ’’ नानासाहेबांनी हात जोडत म्हटलं.
तात्यांनी त्यांचे हात आपल्या हातात धरून नम्र स्वरात म्हटलं, ‘ हे काय स्वामी, आपल्या हुकुमाची तामिली करणं हा माझा धर्म आहे.’’ त्यांनी वाकून प्रणाम केला आणि निरोप घेतला.
नानासाहेब अस्वस्थ झाले होते. ’तात्या, आमचे सैनिक त्यांच्या सैन्यात आहेत हे आमच्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे-तात्या, आम्ही निष्प्रभ झालो?- -अगतिक झालो?- ’ ते फेर्या मारू लागले, गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे राहिले. काही वेळाने रावसाहेब प्रवेशले. पण नानासाहेबांचं लक्षच नव्हतं.
थोडा वेळ झाला. रावसाहेबांना कळेना ते चुळबुळत उभे राहिले. एकेक क्षण जात होता. नानासाहेबांचा चेहरा अधिकाधिक चिंताग्रस्त होत आहे, असं रावसाहेबांना वाटत होतं. काय झालं असेल? काकासाहेबांना विचारावं का? पण त्यांच्या चिंतनात व्यत्यय तर नाही येणार? प्रश्नामागून प्रश्न मनात गर्दी घालत होते, पण काय करावं सुचत नव्हतं.
-देवळात पेंगणार्या आजीबाईंकडे पाहून श्रोत्यांना उद्देशून बुवा म्हणाले म्हणा, ‘विठ्ठल! विठ्ठल! ! विठ्ठ्ल! ! !’
श्रोते नामस्मरणात एकरूप झालेले पाहून त्यांनी त्यांना थांबवत म्हटलं-
श्रोतेहो! तुम्ही विचाराल, तात्याचं काय? ते कुठे आहेत? तात्यांचं काय चाललं होतं? तर- - त्यांनी त्यापूर्वीच आपले पंचवीस स्वार बरोबर घेतले होते. ते मुरारींच्या पलटणीत पोचले. तिथे शिपायांच्या चार पलटणी पेशव्यांकडे अनुकूल करून घेतल्या आणि शिंदे सरकारांना निरोप पाठवला की, आम्ही इतके दिवस इथे राहिलो. तुमच्या मुलुखाला धक्का लागू दिला नाही. आता अाम्ही परत जायचे म्हणतो तेव्हा ओझे वाहून नेण्यासाठी मदत करावी.
‘ मग? त्यांनी मदत केली?’’ न राहवून एका श्रोत्याने प्रश्न केला. बुवा हसून उत्तरले, अहो, काय सांगावं, जयाजीमहाराज शिंदे स्वत: आपले दिवाण दिनकरराव राजवाडे यांना येऊन मुरारीच्या छावणीत येऊन भेटले, त्यांनी शेकडो बैलगाड्या, शिवाय हत्ती, उंट, गाढवं, खेचरं आणि माणसंही दिली. मुरारीकडे जाऊन तात्यांनी त्यांना त्यांच्याकडचे विषारी तोफगोळे मागितले. हा गोळा फुटताच सर्वत्र विषारी धूर पसरत असे. नंतर तात्यांनी आपला मोर्चा गुलसराई संस्थानाकडे वळवला. तिथे पोचताच सुभेदार आणि पलटणींचे प्रमुख यांना एकत्र करून त्यांना सांगितलं, ‘ आम्ही आपल्या धर्मासाठी लढत आहोत. आमच्या पाठीशी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे आशीर्वाद आहेत. आत्ता आम्हाला पैशाची गरज आहे तेव्हा खंडणी म्हणून किंवा खर्चासाठी म्हणून मदत करावी.’’ सुभेदारांनी तात्यांचा निरोप केशवराव गुलसराईवाले यांना दिला. परंतु केशवरावांनी सुभेदारांचं बोलणं धुडकावून लावलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही मुळीच मदत करणार नाही. ते आले तसं त्यांनी निघून जावं, नाहीतर आम्ही त्यांना कैद करू. ते बंडख्रोर आहेत. आपण आमचा निरोप सांगावा. तात्या विचारात पडले. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त पंचवीसएक शिपाई होते.तात्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून सुभेदार म्हणाले, तात्याराव, काळजी करू नका. आम्ही पेशव्यांचे सेवक आहोत. आपण हुकूम द्यावा. सर्व संस्थान लुटून केशवरावांना पकडून हजर करतो.
श्रोतेहो ! तिथे युध्द झालं आणि गावातल्या लोकांनीच केशवरावंच्या मुसक्या बांधून तात्या टोपे यांच्यासमोर हजर केलं. तात्यांनी मुसक्या सोडून केशवरावांना मुक्त केलं आणि विचारलं,
‘आता पेशव्यांना खंडणी किती देणार? ’’
केशवरावांनी मान खाली घातली, म्हणाले, आपण म्हणाल तितकी. शिवाय लागेल ते सामानही घेऊन जावे. परंतु आम्हास जिवंत सोडून द्यावे, ही विनंती. तात्यांनी सुभेदारांकडे आणि सर्व जनतेकडे एक कटाक्ष टाकला. आम्ही पेशव्यांच्या हुकूमानेच वागतो. तेव्हा केशवरावांना कैद करून पक्कया पहार्यात कानपुरास नेऊ आणि श्रीमंता समोर हजर करू. मग केशवराव गुलसराईकर यांना सोडायचं की मारायचं हा निर्णय स्वामीच घेतील.
+++++
श्रोतेहो !एक दिवस सकाळी एक इंग्रज महिला कानपूरच्या बाजारात काही पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठ्या डौलात फिरत होती. समोरून एक वाटसरू आला आणि म्हणाला, ‘आता हा डौल पुरे! आमच्या देशाच्या या बाजारातून लवकरच तुमची हाकालट्टी होणार समजलात?’’ आजूबाजूचे लोक जोरजोरात हसू लागले. त्या स्त्रिनं त्याच्याकडे रागानं पाहिलं आणि तरातरा निघून गेली. कमांडर सर व्हीलरच्या कानावर ही गोष्ट गेली.
श्रोते हो! कमांडरनं गंगेच्या दक्षिण बाजूला एक जागा निवडली. त्या जागेला बळकटी आणण्यासाठी वाळूची पोती भरून त्या गोण्या रचून उत्तम तटबंदी तयार केली. आपल्या देशी कंत्रटदारांना शिपायांच्या भुकेसाठी धान्याचा भरपूर पुरवठा करण्याचा हुकूम सोडला. कंत्राटदारांनी सर व्हीलरच्या हुकुमापेक्षा मुद्दामून कमी धान्यसाठा केला. गोर्यांचं सैन्य तटबंदीत लपून कानपूरच्या सैन्यावर मारा करू शकणार होतं. याच सुमारास कमांडर व्हीलरनं लखौनाला सर हेन्री लॉरेन्सला पत्र पाठवून गोर्या शिपायांची पलटण पाठवण्याची विनंती केली. त्यानं ताबडतोब लेफ्टनंट अॅशेच्या हाताखालचे शिपाई, घोडेस्वार आणि तोफखाना रवाना केला. याशिवाय लेफ्टनंट व्हीलरनं ब्रह्मावर्ताच्या पेशव्यांना कानपूरच्या संरक्षणार्थ येण्याची विनंती केली. श्रीमंत नानासाहेबांनी ती विनंती ताबडतोब मान्य करून कानपूरला लष्करी आणि मुलकी वस्तीच्या मधोमध आपल्या सैन्याचा तळ दिला. कानपूरला बंड झालं तर त्यांच्या हाती खजिना, दारूखाना आणि शस्त्रागारं पडू नयेत म्हणून ते सर्व नानासाहेबांच्या ताब्यात दिलं. याप्रमाणे कानपूरला संरक्षण देण्याची तजवीज केलीं आहे, असं सर व्हीलरनं लॉर्ड कॅनिंगला कळवलं, सध्या कानपूर शांत आणि सुरक्षित आहे. इतकंच नव्हे तर लवकरच लखनौला लष्करी मदत पाठवतो. आणि तो स्वस्थ झाला.
.नानासाहेबांमार्फत तात्यांनी जाऊन एका नेपाळी माणसाला तटबंदीचा चक्रव्यूह तोडण्याबाबत सल्ला घेतला. ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती.
‘ मग? पेशव्यांच्या शिपायांनी तटबंदीचा चक्रव्यूव्ह तोडला? एका श्रोत्यानं उत्सुकतेनं विचारलं.
‘नाही.’’ बुवा हसून उत्तरले. श्रोत्यांची उत्सुकता पाहून त्यांना हसू येत होतं. मेरठच्या अकस्मात उठावणीमुळे ठरवलेलया बेतांची आखणी विस्कटली होती, याचं भान पेशव्यांच्या राजकारण्यांना होतं. योग्य वेळेची ते वाट पहात होते.
‘ पण मी म्हणते, या योग्य वेळेची किती दिवस वाट पाहायची ? ’’ एका बाईंचा प्रश्न.
बुवा गंभीर स्वरात उत्तरले बाई, ‘अशा अधीर होऊ नका. अहो! युध्दाची तयारी चालली होती. परकीय सत्तेच्या हातून सत्ता हिसकावून घेऊन देशाला स्वतंत्र करायचं होतं. सर्व श्रोते एकसुरात बोलले, ‘ बरोबर आहे. बरोबर आहे. ’’
मे महिन्यातली गोष्ट. एका गोर्या तरुण शिपायानं दारूच्या नशेत गोर्यांच्या सैन्यातील एका देशी शिपायावर बंदुकीची गोळी झाडली. त्या शिपायानं गोर्या अधिकार्याकडे तक्रार केली. त्या गोळी मारणार्या गोर्या शिपायाला न्यायासनासमोर उभं केलं. पण गोर्यांना कधीच शिक्षा होत नसे. नेहमीच्या पध्दती प्रमाणे न्यायासनानं सांगितलं, की गोळी चुकून उडाली, म्हणून त्या गोर्या शिपायाला निरपराध म्हणून सोडून देण्यात आलं. उठावाची वाट पहात असलेल्या देशी शिपायांमध्ये क्षोभ निर्माण झाला. ठीक आहे ‘आमच्याही बंदुका लवकरच चुकून उडू शकतात. परंतु मीरतप्रमाणे घाई करायची नाही तर योग्य इशार्याची वाट पहायची, असा निश्चय करून सैन्यातले ते अस्वस्थ शिपाई स्वस्थ राहिले.
इकडे देवळातले श्रोते मात्र अस्वस्थ झाले होते. जागच्या जागी चुळबूळ करू लागले. बुवांच्या ते लक्षात येताच त्यांनी विठ्ठल नामाचा घोष सुरू केला.
विठ्ठल/ विठ्ठल /विठ्ठल/ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल/ श्री ज्ञानदेव तुकाराम/ पंढरीनाथ महाराज की जय/
दिनांक ४ जूनची अंधारी रात्र आली.ठरल्याप्रमाणे बंदुकीचे बार झाले, ठरवलेल्या इमारतीला आग लागली. बुवा सांगू लागले. अस्वस्थ श्रोते सावरून बसले. स्तब्धपणे ऐकू लागले. सुभेदार टीकासिंगचा घोडा कर्कशपणे खिंकाळला आणि दौडत निघाला. पाठोपाठ इतर घोडे निघाले. देशी शिपायांच्या काही पलटणी इंग्रजांच्या घोडपागांना आणि घरांना आगी लावण्यास निघाल्या. इंग्रजांचं निशाण हाती घेऊन एक देशी वृध्द शिपाई उभा होता. त्याच्या हातातली पताका तो देत नाहीसे पाहून हिंदुस्थानच्या शिपायांनी त्याचा शिरच्छेद केला. सुभेदार टीका सिंगनं उंच स्वरात विचारलं, ‘ फिरंग्यांविरूध्द घोडदळ निघालं मग पायदळाला विलंब का होत आहे? ’’हे शब्द कानावर येताच, ‘ हर हर महादेव/ आणि दीन दीन ’’ करीत पायदळ धावत निघालं. कर्नल एवर्ट आपल्या तंबुतून हात उंचावत आला आणि ओरडून सांगू लागला,
‘ अरे बाबांनो हे काय करता आहात? थांबा. थांबा. त्या देशद्रोह्यांच्या मागे लागू नका. तुमच्या राजनिष्ठेला हे शोभत नाही.
इंग्रजांच्या गुलामगिरीला झुगारून घोडदळ, पायदळ नानासाहेबांच्या नबाबगंजच्या छावणीकडे वेगानं निघालं सुध्दा. त्यांनी नबाबगंजच्या श्रीमंत पेशव्यांच्या छावणी पुढे तळ दिला. इंग्रजांचा लाखो रूपयांचा खजिना, शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचा साठा नानासाहेब पेशव्यांच्या ताब्यात आला.
कीर्तन ऐकणारा एक श्रोता उठून उभा झाला आणि उच्च स्वरात म्हणाला, ’ हर हर महादेव / ’ इतर श्रोत्यांनी त्याला प्रतिसाद दिला. सम्मिलित स्वरात देवळाच्या गभार्यात आवाज घुमला ’हर हर महादेव/ हर हर महादेव/ हर हर महादेव/ ’
पेशव्यांचं सैन्य हळूहळू इंग्रजांनी उभारलेल्या तटबंदीकडे जाऊ लागलं. पेशव्यांच्या शिपायांनी त्या तटबंदीला वेढा दिला. तिथे मराठ्यांच्या तोफा रोखलेल्याच होत्या. अनेक जमीनदार, संस्थानिक पेशव्यांच्या सैन्याला येऊन मिळत होते.
इंग्रजांनी कानपुरात गंगानदीच्या पाण्यात वाळूची आणि कापसाची पोती टाकून तटबंदी उभारली होती. ग्रीष्मातल्या उन्हाची तिरीप, त्यात हा त्रास शिवाय धान्याचा तुटवडा होता. पाण्याची एकच विहीर होती. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी तरी किती पुरणार. इंग्रजांचे हाल होत होते. कर्नल आर्मस्ट्राँगला जखम होऊन तो खाली पडला असता त्याचा समाचार घेण्यासाठी लेफ्टनंट प्रोल तिथे गेला. समाधानाचे दोन शब्द बोलतो न बोलतो तोच समोरून बंदुकीची गोळी येऊन त्याच्या मांडीत घुसली आणि तो खाली पडला. त्याचा एक हात आपल्या खांद्याभोवती घेत कॅप्टन थॉमस त्याला सर्जनकडे नेण्यासाठी निघाला आणि एक गोळी थॉमसला लागली. दोघेही जमिनीवर जखमी होऊन पडले. त्यांना त्या अवस्थेत पाहून गिलबर्ट बक्स धावला, पण त्याच्या पाठोपाठ वेगानं आलेली बंदुकीची गोळी त्याच्या शरीरात घुसली आणि त्याला मृत्यूच्या दारात घेऊन गेली. अनेक गोरे अधिकारी, गोरे सैनिक, गोर्या स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. काही गंगेकडील बाजूनी बाहेर पडले. पेशव्यांच्या शिपायांनी त्यांना कैद करून आणलं. गोर्यांच्या सैन्यातील देशी शिपाईही पेशव्यांच्या बाजूने लढू लागले. मिल्स शेफर्डची बायको आणि मुलगी या युध्दात मेली, तेव्हा त्यानं मराठ्यांच्या गोटात जाऊन हेरगिरी करण्याचं ठरवलं. एका देशी स्वयंपाक्यासारखा वेश घेऊन तो बाहेर पडला. चारआठ पावलं चालतो न चालतो तोच त्याला पकडण्यात आलं. कैद करून श्रीमंतांसमोर उभं करण्यात आलं. प्रथम त्याला अटकेत ठेवण्यात आलं आणि मग पेशव्यांच्या कोर्टापुढे हजर केलं. त्याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
जूनची २३ तारीख उजाडली. तात्या शिपायांसमोर उभे झाले आणि गरजले, ‘ बरोबर शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी हिंदुस्थानवर तलवारीचा पहिला वार केला. आज शंभर वर्ष लोटली तरी परदास्याचा तो घाव बुजलेला नाही. पण आज आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि शत्रूवर आक्रमण करून स्वातंत्र्य मिळवू किंवा मारता मारता मरण पत्करू.’’
सर्व शिपायांना स्फूरण चढलं. घोडदळ तटाकडे धावलं. शत्रूंच्या गोळ्यांना ते जुमानत नव्हते. पायदळाचे शिपाई तटबंदीवरच्या कापसाच्या गोण्या ढकलत ढकलत आत सरकवू लागले. इंग्रजांनी कानपुरात जी तटबंदी उभारली होती, तिथून आतून तोफेचे गोळे येऊ लागले. ती तटबंदी फोडण्यासाठी तात्यांनी मुरारीकडून आणलेले विषारी तोफगोळे उडवण्याची आज्ञा शिपायांना दिली. श्रीमंत बाळासाहेब पेशवे स्वत: तोफेला बत्ती देत होते. तो गोळा आत जाऊन पडताच तिथल्या गोर्या शिपायांच्या डोळ्यांना धूर झोंबू लागला. तटबंदी फोडू नये म्हणून गोरे आतून तोफे चे गोळे मारीत होते. एकच रणधुमाळी माजली. हा हल्ला अगदीच व्यर्थ गेला नाही.इंग्रजांचा धीर सुटू लागला. पेशव्यांच्या हातून बचावणं शक्य नाही असं दिसून येताच दोन दिवसांनंतर इंग्रजांनी शरणागती पत्करण्याचं ठरवलं.

Comments
Post a Comment