प्रकरण १४ वे तात्यांच्या ब्रिटिशांना हुलकावण्या
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण १४ वे तात्यांच्या ब्रिटिशांना हुलकावण्या
इकडे देवळात आळेकर बुवा सांगत होते. तात्यांचा पहिला फासा भरतपूरवर होता. परंतु तिथे गोरी सेना आणण्यात आली आहे, हे कळताच तात्या जयपूरकडे वळले. जयपूरच्या दरबारात तात्यांच्या बाजूचे अनेक लोक होते. तिथला राजा आणि प्रजा तात्यांच्या अनुकूल होती. म्हणून तात्यांनी त्यांच्याकडे दूत पाठवून त्यांना सज्ज राहण्याची सूचना दिली. पण इंग्रजांना या बातमीचा सुगावा लागला आणि इंग्रज सैन्य नसिराबादहून जयपूरला येऊन उतरलं. जयपूरचा बेत रद्द करून तात्या एकदम हिंदुस्थानच्या दक्षिणेकडे निघाले. कर्नल होम्स त्याच्या सैन्यासह तात्यांच्या मागावर होताच, म्हणून तात्यांनी आपला मार्ग बदलून टोक संस्थानावर चाल केली. तिथल्य नबाबाला ही बातमी कळताच त्यानं आपले दरवाजे तात्यांसाठी बंद केले. इतकंच नव्हे तर आपल्या निवडक शिपायांना चार तोफा देऊन तात्यांच्या सैन्यावर चाल करायला सांगितलं. आता लढाईला तोंड लागणार तोच टोकचे शिपाई पुढे येऊन तात्यांच्या शिपायांना आलिंगन देऊ लागले. इतकंच नव्हे तर त्या शिपायांनी आपल्या जवळच्या चार तोफा तात्यांच्या शिपायांच्या हवाली केल्या. नवं सैन्य नवीन तोफा घेऊन नव चैतन्यानं तात्या इंद्रगडाला येऊन थांबले. पण त्यांच्या मागावर होम्स होताच आणि बाजूनं रॉबर्टसुद्धा धावून आला. पावसाळ्याचे दिवस. धुवांधार पाऊस, समोर चंबळनदी दुथडी भरून वहात आहे. मागे आणि बाजूने शत्रू तात्यांनी क्षणभर विचार केला आणि आपला रोख हिंदुस्थानच्या नैॠत्य दिशेकडे बुंदीकडे वळवला. बुंदी संस्थानचा राजा पेशव्यांच्या उठावाच्या फारसा प्रतिकूल नव्हता, पण आता इंग्रज सैन्य तात्यांच्या पाठीमागे आहे हे कळताच त्यानं आपल्या संस्थानचे दरवाजे तात्यांच्या सैन्यासाठी बंद केले. हे पाहून तात्यांच्याबरोबर असलेल्या नरवरच्या राजा मानसिंगनं विचारलं , ‘ तात्या, आता काय ? ’’
तात्या काहीही न बोलता घोड्याला टाच देऊन वेळ न घालवता वळसे घेत घेत आपल्या सैन्यासह नीमच आणि नसिराबाद इथे येऊन पोचले. राजा मानसिंग आश्चर्यचकित झाला. दक्षिणेकडे जाण्यासाठी निघालेले तात्या शत्रूला चुकवत चुकवत भिलवाड्याच्या जंगलात पोचले.
‘ चला. बरं झालं.’’देवळातला एक श्रोता सुटकेचा श्वास टाकू न म्हणाला.
बुवा हसले. त्यांनी हातातल्या टाळांचा गजर केला आणि म्हणाले, तात्यांच्या सैन्यानं जरा मोकळा श्वास घेतला न घेतला तोच सवरगावहून रॉबर्ट अपल्या सैन्यासह धावून आला आणि तात्यांच्या सैन्यावर तुटून पडला. पण तात्यांचं सैन्य सज्जच होतं. रॉबर्टच्या सैन्याशी दिवसभर झुंजत झुंजत त्यांना त्यांनी थोपवून ठेवलं. रात्री तात्या आपलं सैन्य आणि तोफांसह उदेपूरच्या हद्दीतील कोटरा गावापर्यंत येऊन पोचले. सैन्य विश्रांती घेत होतं. तात्या मात्र त्या रात्री जवळच असलेल्या नाथद्वारा या क्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्णदेवांच्या दर्शनाला गेले. तिथून मध्यरात्री परतत असतानाच त्यांना बातमी मिळाली की, इंग्रजांचं सैन्य अगदी नजीक येऊन ठाकलं आहे. तात्यांनी कोटरा गावाहून मुक्काम हलवण्याचा आदेश दिला. पण पायदळातील शिपायांनी स्पष्ट नकार दिला. कारण आता त्यांच्यात चालण्याचं बळ नव्हतं. माणसं दमली तसे घोडेही दमले असतील असा विचार करून तात्यांनी नदीच्या ज्या बाजूकडून शत्रू पुढे येणार त्या मैदानाकडे तोफा रोखून ठेवल्या. तात्यांच्या तोफांच्या मार्याकडे दुर्लक्ष करून रॉबर्टचे गोरे सैनिक आणि देशी सैनिक नदीत उतरून काठावर आले आणि तात्यांच्या सैन्यावर तुटून पडले. तात्यांचं सैन्य मागे हटलं, तोफा टाकून पळालं. इंग्रज सैन्यानं तात्याच्या सैन्याचा पाठलाग केला. तात्या त्यांना चुकवून चंबळ नदीच्या दुसर्या तीरावर थडकले. पण दुर्दैव संपलं नव्हतं. काही तासांच्या अंतरावर पार्क तात्यांच्या येण्याची वाट पहात दबा धरून होता. तात्यांना याचा अंदाज आला, त्यांनी आपल्या सैन्याबरोबर चंबळ नदी पार केली आणि इंग्रजांना गुंगारा दिला.
‘ वा रे वा ! वाघा.’’ एका श्रोत्यानं तात्यांच्या शौर्याला दाद दिली. आळेकर बुवांनीही हसून त्या श्रोत्याच्या उत्स्फूर्त उद्गाराचं स्वागत केलं आणि नामस्मराणाला सुरूवात केली.म्हणा-
विठ्ठल/ विठ्ठल/ विठ्ठल/ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल/ श्री ज्ञानदेव तुकाराम/ पंढरीनाथ महाराज की जय /
बुवा पुढे सांगू लागले. काय सांगावं महाराजा, तात्या टोपेंच्या जवळ आता तोफा राहिल्या नव्हत्या, रसद राहिली नव्हती, पैसेही नव्हते. तात्या आपल्या सैन्यासह झालारपट्टण संस्थानावर चालून गेले. तिथल्या अधिपतीनं आपला जंगी तोफखाना घेऊन तात्यांवर चाल करण्याचा हुकूम दिला आणि काय आश्चर्य! मूर्तिमंत तात्याच समोर आलेले पाहून झालारपट्टणच्या संस्थानिकाचे सर्व शिपाई तात्यांना सलाम करू लागले. त्यांनी तात्यांना त्या सैन्याजवळच्या तोफा, घोडे, गाड्या आणि रसद दिली. नंतर रावसाहेब पेशव्यांनी राजाकडे पंचवीस लक्ष रूपये खंडणी मागितली. राजाने त्यांची भेट घेऊन गयावया केली आणि पंधरा लक्ष रूपये घेण्याची विनंती केली. ती विनंती मान्य करून तात्या, रावसाहेब आणि बांद्याचे नबाब यांनी आपल्या सैन्यासह तिथेच पाच दिवस मुक्काम केला. आपल्या सैन्यातील लोकांना पगार वाटला. नवीन सैन्य, नवीन, तोफखाना, नवीन रसद घेऊन पेशव्यांचा नर्मदा नदी उतरून दक्षिणेकडे जाण्याचा इरादा होता. पण इंग्रज सैन्य त्यांना ठिकठिकाणी अडवू पहात होतं. पण तात्यांनी अचानक आपला मोर्चा इंदूरकडे वळवला. तात्या माळव्यात घुसून राजगडला येऊन पोचले. रॉबर्ट, होम्स, पार्क, होप, मार्क, मिचेल, होर्ट यांची इंग्रज सैन्य वेगवेगळ्या दिशेनं तात्यांचा पाठलाग करीत होती. तात्या दक्षिणेकडे जाता जाता अचानक इंदूरकडे वळल्यानं त्यांची फारच त्रेधा तिरपिट उडाली. कोणी उज्जयिनीकडे गेला, तर कोणी महूकडे, कोणी तळखेड्याकडे, तर कोणी राजगडाकडे. मेजर जनरल मिचेल आपल्या सैन्यासह एका ऊंच जागी चढतचढत गेला, पाहतो तो समोर देशातल्या लोकांचं सैन्य, त्यांच्या सेनापतीसह उतरलेलं दिसलं. मिचेलच्या सैन्यातला एक देशी सैनिक हळूच म्हणाला, ’बहुतेक तात्या टोपेंचे सैनिक आहेत.’
‘ अरेरे! त्या मेल्या देशी सैनिकाला बोलायची काही गरज? आता पुढे काय होणार? ’’ श्रोत्यांमध्ये फुलांचा हार करणार्या आजींचा स्वर थरथरला आणि हात थबकला. आता पुढे काय? बुवांनी पुन्हा तोच प्रश्न स्वत:शी उच्चारला.
‘ तात्या गोर्या साहेबाच्या हाती सापडले की काय?’’ दुसर्या एका श्रोत्यानं विचारलं.
‘ आता समोरच दिसल्यावर सापडणारच.’’ तिसर्याच एका श्रोत्यानं उत्तर दिलं. सर्व श्रोते खिन्न झाले. देवळातलं वातावरण एकदम गंभीर झालं. बुवांनी हातातल्या झांजांचा गजर केला आणि म्हणाले, ‘नाही. तुम्हाला वाटतं तसं काही झालं नाही.’’
‘ अगबाई ! म्हणजे? त्या मिचेलच्या हातात तात्या लागले नाहीत?’’
‘ नाही. उंचावर चढून आल्यानं मिचेलचे सैनिक खूप थकून गेले होते. तिथे पोचताच त्यांनी बसकणच मारली. तेव्हा एक रात्र विश्रांती घेण्याचा मिचेलनं विचार केला आणि दुसर्या दिवशी तात्यांच्या सैन्यावर हल्ला चढवायचा. पण सकाळी उठून पाहतात तो काय? तात्यांचं सैन्य तिथे नाहीच.’’
‘ बरं झालं बाई ! ’’ इतका वेळ हातातलं फूल धरून असलेल्या आजींनी मोठा नि:श्वास टाकला. त्या पुन्हा हार करू लागल्या.
आळेकर बुवा बोलतच होते, मिचेलनं सैन्य घेऊन तात्यांच्या सैन्याचा पाठलाग सुरू केला. तात्यांच्या शिपायांना तोफा घेऊन वेगानं उतरणं कठीण होत होतं. शेवटी तात्यांच्या आज्ञेनुसार शिपाई तोफा टाकून पसार झाले. राजगडाच्या मैदानातून तात्या सैन्यासह निघाले ते वेखा नदीच्या किनारी असलेल्या अरण्यात घुसले. जंगल पार करून सिरोज गावी बाहेर पडले. तिथे तात्यांना चार तोफा मिळाल्या. जोरदार पाऊस होता, त्यामुळे इंग्रजांची सैन्यं जागच्या जागी खिळून होती. तात्यांच्या सैनिकांनाही विश्रांती मिळाली. पावसाचा जोर कमी होताच तात्या सैन्य घेऊन उत्तरेकडे वळले. शिद्यांच्या मुलुखातलं इसागड हे ठाणं तात्यांनी हस्तगत केलं. रावसाहेब पेशवे तात्यांबरोबर होते ते म्हणाले, ‘ तात्या, आपण नर्मदा नदी पार करून जायचं ठरवलं होतं, पण दिवसेंदिवस नर्मदेपासून दूर दूर जात आहोत. इंग्रज काही आपली पाठ सोडत नाही. शिकारी कुत्र्यांप्रमाणे मागे धावताहेत. ’’
‘स्वामी, आपण म्हणता ते अगदी खरं आहे, पण धावणारे कुत्रे धावून धावून एक दिवस थकतातच. आता आपण पुन्हा विभक्त होऊ आणि इंग्रजांशी लढू.’’
‘ मग पुढे काय झालं? ’’ एका श्रोत्यानं न राहवून विचारलं.
बुवा सांगू लागले. रावसाहेब पेशव्यांनी स्मित करून तात्यांच्या शौर्याला दाद दिली. दोघेही आपली आपली सैन्यं घेऊन दोन दिशेला लढायला गेले. कधी झुंज दिली, कधी गनिमी कावा करून लढले, कधी तोफा मिळवल्या, कधी तोफा गमावल्या. शत्रूला हुलकावण्या दिल्या. मंगरोली, छिंदवाडा इथे तात्यांच्या सैन्यानं शत्रूशी लढाई केली. कधी लढाई तर कधी शत्रूकडून पाठलाग होत असता निसटून जाणं. असं करता करता ललितपूर इथे तात्या आणि रावसाहेब परत एकत्र आले. शत्रूचं वलय दिवसेंदिवस आकुंचित होत होतं. त्यांना हुलकावणी देऊन ते दोघे कजुरीला आले. पुढे बेटव्याला इंग्रज येत आहेत असा सुगावा लागताच ते पुन्हा जंगलात घुसले. हुलकावण्या देत देत उत्तरेकडे ताल बहतपर्यंत चढत गेले. तात्यांनी रावसाहेबांना म्हटलं, ‘ स्वामी, आता अचानक बेटवा उतरून कजुरीला जाऊ. ’’
तिथे शत्रू उभाच होता त्याच्याशी दोन हात करून, रायगडला इंग्रजांना टक्कर देऊन, तात्या आपल्या सैन्यासह दबत, लढत, हुलकावण्या देत दक्षिणेकडे निघाले इंग्रजांची सैन्य होतीच. कोणी मागे, कोणी डाव्या बाजूनं, तर कोणी उजव्या बाजूनं, तरीही तात्या नर्मदातीरी पोचलेच. नर्मदा नदी पार करून गेले. अहो! तात्यांचं सैन्य दिवसाला तीस ते चाळीस मैल पुढै जात होतं. वार्याप्रमाणे डोंगरावरून, घाटातून, नद्यांवरून, या गावातून, त्या गावातून, कधी सरळ, तर कधी अचानक वळसा घेऊन पुढे जात होतं. गावोगावचे लोक तात्यांच्या सैन्याला भक्तिभावानं अन्नधान्य देत होते. अगदी फुकट. देशप्रेमानं प्रेरित होऊन. आपल्या देशाच्या प्रेमानं, जनतेच्या प्रेमानं भारावलेल्या तात्यांच्या मूर्तीकडे लोक पूज्य भावनेनं पहात होते. खरं तर कितीतरी गावं उध्वस्त झाली होती. तर काय सांगत होतो? तात्यांनी नर्मदा नदी पार करून हुशंगाबाद शहर गाठलं.
‘ धन्य !धन्य!! तात्या टोपे!!! ’’ एक श्रोता मधेच उभं राहून बोलला. बाकीच्या श्रोत्यांनी टाळ्या वाजवून गजर केला.
अहो! आता तात्यांनी आपला मोर्चा नागपूरकडे वळवला. काय सांगावं बाकाबाईंच्या देशद्रोहाचा चटका तात्यांना सहन झाला नाही. नागपूर, मेळघाट, खानदेश, असिरगड, सर्व बाजूंनी येऊन इंग्रज सैन्यानं तात्यांना दक्षिणेकडचे दरवाजे बंद केले.
‘ मग? तात्या सापडले? ’’ कीर्तन ऐकणार्या आजीबाईंनी काळजीयुक्त स्वरात विचारलं.
‘ नाही. तात्यांनी वेगळाच फासा टाकला. आग्रा रस्ता ओलांडून, इंग्रजांच्या डाक गाड्या लुटून, तारा तोडून तात्या नर्मदा नदीकडे निघाले. मागोमाग इंग्रज सैन्य होतंच. तिकडे उत्तरेकडे तात्या हातातून निसटले म्हणून खिन्न झालेले इंग्रज सेनापतीही खाली नर्मदेच्या दिशेनं उतरत आले. नर्मदा नदीच्या आजुबाजूच्या सर्व किल्ल्यांवर इंग्रजांनी सक्त पहारा ठेवला होता. पावसामुळे नर्मदा नदीला पूर आला होता, ती दुथडी भरून वहात होती. तात्या विचारात पडले, ’नदी पार कशी करायची?’ तात्यांनी पाहिलं एका वृक्षाखाली एक वृध्द बसलेला त्यांना दिसला. त्यांनी त्याचा सल्ला मागितला. तो एवढंच बोलला, ‘मुखाजवळ नदीचं पात्र खूप लहान असतं.’’ तात्या सैन्य घेऊन नर्मदा नदीच्या मुखाकडे वळले. नदी पार करून करगूण गावी गेले तिथे मेजर संडरलँड सैन्यासह उभा होता. सेना भिडल्या, लढाई सुरू झाली, लढाईला जोर असताना अचानक तात्यांनी आपल्या शिपायांना आज्ञा दिली की, गोळीबार बंद करा आणि नर्मदेत उड्या घ्या. शिपायांनी आपल्या सेनापतीची आज्ञा वंद्य मानली आणि गोळीबार बंद करून नदीत उड्या घेतल्या आणि बघता बघता तात्यांचं सैन्य इंग्रजांच्या नजरेच्या टप्याच्या पलीकडे गेलं सुध्दा. इंग्रज सेनानी आ वासून बघतच राहिले.
‘ शाब्बास ! तात्या, किती चतुराई ही. अगदी मीठ मोहर्या ओवाळून टाकाव्या होऽ.’’ श्रोत्यांमधल्या आजी आनंदानं जवळजवळ ओरडल्याच. आपले दोन्ही हात ओवाळून कानशिलावर बोटं मोडली आणि त्यांनी समोर नसलेल्या तात्यांची दृष्ट काढली.
‘ तात्यांच्या चातुर्यानं थक्कच व्हायला होतं आहे’, दुसरा श्रोता कौतुकानं बोलला.
एवढ्यात एक तरुण उठला, हात उंचावून म्हणाला, ‘तात्या टोपेंच्या चातुर्याचा जयजयकार असो.’
इतर श्रोत्यांनीही त्या घोषणेला प्रतिसाद दिला. आळेकर बुवांनी हातातील झांजांचा गजर केला आणि ते म्हणाले, तात्यांच्या लढाईतला हा प्रसंग म्हणजे आजपर्यंतच्या लढाईच्या इतिहासातला एक अतुलनीय आणि आश्चर्यकारक प्रसंग मानला जातो. त्या क्षणी तात्यांनी जो निर्णय घेतला त्याला तोड नाही. एक इंग्रज इतिहासकार लिहितो की, ’हिंदुस्थानातील शिपायांना या बाबतीत कोणीही हरवू शकत नाही. जगातले कोणतेही सैन्य त्यांची बरोबरी करू शकणार नाही.’ देवळातल्या श्रोत्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या.
आळेकरबुवांनी सूर लावला आणि ते संत रामदासांचा श्लोक गाऊ लागले. हार्मोनियमवर तेच सूर वाजू लागले. संत रामदास म्हणतात-
धर्मासाठी मरावे, मरोनि अवघ्यांसि मारावे/
मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले//
होऽ! जीवाला धोका होता, तरीही तात्या आणि त्यांचे सैनिक लढत होते. तात्या आपल्या सैन्यासह बडोद्याकडे निघाले. तिथल्या दरबारात आणि सैन्यात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या पक्षाचे अनेक लोक होते. हे लोक तात्यांच्या येण्याची अतुरतेनं वाट पहात होते. तात्या राजापूरला गेले तिथे त्यांना काही घोडे आणि थोडं द्रव्य मिळालं. ते घेऊन तात्यांनी छोटा उदेपूर गाठलं. आता बडोदा शहर काही अंतरावरच होतं. इंग्रजांना याचा सुगावा लागला. त्यांनी त्या काही अंतरातच आपलं सैन्य ठिकठिकाणी पेरून ठेवलं. पार्कला तात्यांच्या येण्याचा सुगावा लागताच तो सैन्य घेऊन तात्यांच्या आधीच छोटा उदेपूरला पोचला. तात्यांना बहुदा याचा अंदाज आला असावा. ते उदेपूरला न जाता उत्तरेला वासवारा जंगलात घुसले. त्यांच्या बरोबर रावसाहेब पेशवे होतेच. जंगलातल्या ओढ्यावर हातपाय धुवून तात्या आले आणि त्यांनी रावसाहेबांना बातमी दिली.
‘ स्वामी, बांद्याच्या नबाबाच्या बायकोनं इंग्रजांपुढे शस्त्र खाली ठेवली आहेत.’’
‘ मग आता? ’’ रावसाहेबांचा स्वर किंचित् कंपित झाला.
‘ इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीनं म्हणे, जाहीर केलं आहे. जो कोणी शरण येईल त्याला अभय देणार’.
‘ आपणही शरण जायचं? तात्या, बोला.’’ रावसाहेबांचा चेहरा उतरला हे पाहताच, तात्या ताडकन् उत्तरले. ‘ स्वामी, असा विचारही मनात आणू नका. आपल्या वीरांच्या अंत:करणात स्वत्वाचा आत्मविश्वास आहे आणि देशप्रेमाचा शेवटचा बिंदू शिल्लक आहे तोपर्यंत आपण लढत रहायचं. आपल्या तलवारीची धार कायमच राहील. बरोबर? ’’
‘ मला तुमच्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. पण मग आता पुढे काय? ’’
‘ जंगलाच्या बाहेरच्या किल्ल्यातील किल्लेदार आपल्याला थोडी मदत देणार आहे, ती घेऊन आपण उदेपूरला जाऊ.’’
‘ पण तिथेही इंग्रज सेना उभी असेल तर?’’
‘असेल नाही, मेजर रॉक आपलं सैन्य घेऊन उभाच आहे. पण आपणच त्यांच्यावर जोरदार चढाई करायची. ’’ तात्या उत्तरले.
‘ पण यात धोका तर नाही? ’’ रावसाहेबांनी शंका उपस्थित केली.
‘स्वामी, आपल्याच देशात स्वातंत्र्यासाठी लढणार्या आपल्याला पावलोपावली धोका आहे, हीच दुर्दैवी गोष्ट आहे. पण आता पाऊल मागे घ्यायचं नाही. चला उठा. तयारीला लागायला हवं. ’’
आळेकरबुवा सांगू लागले, देशप्रेमानं झपाटलेले ते दोघे शूरवीर आपलं सैन्य घेऊन उदेपूरला जंगलाच्या बाहेर पडले. मेजर रॉकच्या सैन्यावर त्यांनी जोरदार हल्ला केला. पहिल्याच चढाईत मेजर रॉकच्या सैन्याची फळी फोडून ते कोंडीतून निसटले. याचवेळी तात्यांच्या आणि रावसाहेबांच्या मदतीसाठी अयोध्येचा शूरवीर फिरोजशहा आणि शिद्यांच्या दरबारातील सेनापती मानसिंग हे आपल्या सैन्यासह गंगा आणि यमुना नद्या पार करून येऊन मिळाले. इंद्रगड इथे त्यांची भेट झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळमळणारे ते चार नेते एकत्र आले, इंग्रजांवर चढाई कशी करायची याचे बेत आखू लागले.
एवढ्यात राजा मानसिंग यांनी खबर दिली ,‘ भय्या, इंद्रगडच्या चारही बाजूंनी गोरी सेना येत आहे.’’
रावसाहेबांनी विचारलं , ‘ खबर पक्की आहे का? ’’
‘ हो पक्की खबर आहे.’’ राजा मानसिंग उत्तरले. ‘ भय्या, आता काय करायचं?’’
तात्यांनी राजा मानसिंग यांना धीर देत म्हटलं, ‘ राजे, निराश होऊ नका. अहो! आपल्या देशातील प्रजेचं शत्रूपासून संरक्षण करायचं हे राजाचं कर्तव्य. मग? राजाच हातपाय गाळायला लागला तर कसं? प्रजेनं कोणाकडे पहायचं? ’’
‘ तसं नाही, पण आपणच शत्रूच्या हाती लागलो तर? ’’ मानसिंग यांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली.
रावसाहेब जरा चढ्या स्वरात बोलले, ‘ मानसिंग आमच्या बरोबर रहायचं ठरवलं आहे ना? मग मनातलं शंकांचं जाळं फेकून द्या. तात्यांकडे वळून पहात रावसाहेबांनी विचारलं, ‘ तात्या, आता पुढे काय?’’
तात्या खाडकन् उभे झाले आणि म्हणाले, ‘ताबडतोब इंद्रगड सोडून देवासला जायचं. वेगानं. ’’
आळेकर बुवा सांगू लागले, आणि काय सांगावं महाराजा, ते चौघे आपलं आपलं सैन्य घेऊन वेगानं देवासला पोचले. आजूबाजूनं येणार्या इंग्रज सेनानींना याचा सुगावाही लागला नाही. उत्तरेकडून नेपर, वायव्येकडून शॉवर, पूर्वेकडून सॉमरसेट, दक्षिणेकडून मिचेल आणि बेन्सन, नैॠत्येकडून बोनर, आग्नेय दिशेकडून स्मिथ, असे इंग्रज सेनानी तात्यांना कोंडीत पकडण्यासाठी धडपडत होते. देवास इथे पुढचे बेत आखत असताना अचानक तात्यांच्या मानेवर हात पडला. त्यांची छावणी इंग्रज सैन्यानं ताब्यात घेतली होती. सेनानीसकट सर्व जण ओरडू लागले,’ पकडला! पकडला!! तात्याला पकडला!!! ’ एकच गोंधळ माजला.
देवळातले श्रोते एकदम उभे झाले. ‘काय? इंग्रजांनी तात्यांना पकडलं? ’’
‘ अरेरे!’’
‘ असं व्हायला नको होतं. सिंव्ह जाळ्यात सापडायला नको होता.’’
‘ देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूशी प्राणपणानं लढणारा सेनानी होता तो.’’
देवळातल्या श्रोत्याच्या प्रतिक्रियांचा आवाज घुमटात घुमत होता. आळेकरबुवांनी सगळ्यांना शांत करीत म्हटलं, एक इंग्रज ओरडला, ‘ व्हेअर इज तात्या? यू फूल. तात्या कुठे हाए? डिसअपिअर्ड.’’
‘ शोधा. शोधा.’’ छावणीत एकच गडबड उडाली. तात्या आणि त्यांचे सहकारी आपल्या सैन्यासह केव्हा पसार झाले ते कोणालाच कळलं नाही.
देवळात टाळ्यांचा कडकडाट झाला. बुवांनी हातातल्या झांजांचा गजर करीत नामस्मरणाला सुरूवात केली.
विठ्ठल/ विठ्ठल/ विठ्ठल/ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल/
श्री ज्ञानदेव तुकाराम /पंढरीनाथ महाराज की जय/
- तिकडे सेनापती होपच्या कानी वार्ता आली की, तात्या आपल्या सहकार्यांसह अलवार शिखरावर आहे. सेनापती होप तिकडे धावला. खाली तात्यांच्या सैन्याचा तळ होता. एक पांढरा घोडा शिखर चढत येत होता. त्यावरच्या स्वारानं पांढराशुभ्र पेहराव केला होता. आपल्या शिपायांना तो लढण्याचा इशारा देत असतानाच शत्रूची एक गोळी सूंऽ सूंऽ करत आली आणि त्या वीराला घायाळ करून गेली.
तात्या टोपे घायाळ झाले, नव्हे मेलेच, या आनंदात शत्रू होते. पण वर जाऊन पाहतात तर तिथे कोणीच नव्हतं. काय घडलं? तिथली व्यक्ति अचानक गायब कशी झाली? तात्या कुठे गेले?
‘अरेरे! तात्या खरच धारातीर्थी पडले का?’’अत्यंत दु:खी स्वरात देवळातल्या श्रोत्यांनी सम्मिलीतपणे प्रश्न विचारला.
‘ नाही. तात्या आणि त्यांचे सहकारी तिथून निघाले ते चंबळच्या जंगलात गेले. एक दिवस रावसाहेब तात्यांना शोधत फिरत आले. ‘ तात्या! तात्या! कुठे आहात? ’’
थकलेल्या स्वरात तात्यांचं उत्तर आलं, ‘ मी इथे आहे स्वामी. ’’
रावसाहेबांनी जाऊन तात्यांचा हात धरून ते त्यांना घेऊन आले. तात्यांची जखमी अवस्था पाहून रावसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचा कंठ दाटून आला, ‘तात्या, हे काय चाललंय? बांदेवालया नबाबाची राणीही इंग्रजांना शरण गेली. कोणीतरी म्हणालं, इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियानं जाहीरनामा काढला आहे, जो इंग्रजांना शरण जाईल, त्यांना ती माफ करील. ती खूप दयाळू आहे. या देशातले राजे, नबाब, जमीनदार, वतनदार एका पाठोपाठ इंग्रजांना शरण जात आहेत. ’’
तात्यांनी उदास स्वरात विचारलं, ‘ स्वामी, तुम्ही खचलात? उमेद सोडली? ’’
रावसाहेब त्वरित उत्तरले, ‘ नाही तात्या, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण अशा घायाळ अवस्थेत आपण काय करू शकतो? ’’
तात्या आवेशानं म्हणाले, ‘कसंही करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतो. ’’
रावसाहेबांनी स्मित केलं, ‘ तात्या, तुम्ही हेच म्हणत राहणार.- - पण तात्या, या जखमा- - मला आता मुक्त करा.’’
रावसाहेब पुढे झाले तात्यांच्या पायांवर डोकं ठेवायला वाकले. तात्या मागे सरकले आणि आदबीनं उद्गारले,‘ स्वामी! अहो, हे काय करता? मी आपला सेवक आहे. स्वामी, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण जाऊ शकता, फक्त जाण्यापूर्वी मला आज्ञा द्या की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन. ’’
रावसाहेबांचे डोळे भरून आले, त्यांना तात्यांच्या देशप्रेमाची प्रचिती आली आणि अभिमानानं ऊर भरून आलं. ‘ तात्या, तुम्ही थोर आहात. या अशा जखमी अवस्थेतही एकच स्वप्न उराशी घेऊन लढायचं म्हणता आहात. तुमच्यासारखा योद्धा यापूर्वी झाला नाही, होणार नाही. ’’
तात्यांनी नकारार्थी मान हलवली, रावसाहेबांना या देशाच्या पूर्वजांची आठवण करून देत तात्या म्हणाले, ‘चुकता आहात स्वामी. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वामी, तुमच्या पूर्वजांनी अटकेपार झेंडे नेले होते, हे विसरता आहात. त्यांचा पराक्रम आठवा. जीवनाच्या अंतापर्यंत जीवाच्या आकांतानं आपण लढायला हवं. बोलता बोलता तात्या थांबले. काहीतरी विचार करीत त्यांनी रावसाहेबांना सुचवलं, ‘स्वामी, आपण दोघे वेगवेगळे होऊ. आपल्या सैन्याची दोन विभागात विभागणी करू म्हणजे या परिस्थितीतही एकाच वेळी देशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लढता येईल.’’
रावसाहेबांना ही कल्पना एकदम आवडली, ते म्हणाले, ‘ठीक आहे. मी माझे सैनिक घेऊन दुसरीकडे जाईन, तिथे लढेन. पण तात्या, तुम्ही तुमची काळजी घ्या. जखमा बर्या होऊ द्या मग बाहेर पडा. रावसाहेबांनी डोळे पुसले आणि ते तिथून गेले. स्वामींच्या जाणार्या आकृतीकडे तात्या पहात राहिले. या विरहानं तात्यांनाही अश्रू आवरत नव्हते.
आळेकर बुवांनी खिन्न स्वरात नामस्मरणाला सुरूवात केली.
विठ्ठल/ विठ्ठल/ विठ्ठल/राम राम सीताराम सीताराम/
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल/ श्री ज्ञानदेव तुकाराम/
पंढरीनाथ महाराज की जय/
होऽ! तर ठरल्याप्रमाणे रावसाहेब, फिरोजशहा, दोघंही दोन बाजूला गेले. सर्वजण एकमेकांपासून दूर. आपला पराक्रम गाजवण्यासाठी. पण इंग्रज तात्यांच्याच शोधात होते. तात्या वायुवेगानं येत हल्ला करीत आणि निघून जात. कुठून येत आणि कुठून जात कळतच नसे. वार्यासारखे येत आणि वार्या सारखे जात.
बुवांनी ओवी म्हणायला सुरूवात केली, धन्य तूची माता/ धन्य तुझी कूस.
असा शूर बालक तुझा /देशाचे भूषण //

Comments
Post a Comment