प्रकरण १० वे. बायकामुलांच्या आडून दारूगोळा वाहून नेणारं गलबत
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण १० वे बायकामुलांच्या आडून दारूगोळा वाहून नेणारं गलबत
देवळात कीर्तनकार आळेकर बुवा वर्णन सांगत होते. एक दिवस ब्रह्मावर्तातील ध्रुवघाटावरील माणसाला दुर्बिणीतून प्रयागकडे जाणारं एक मोठं गलबत दिसलं. त्यात इंग्रजांच्या बायका मुलं असावीत असा त्याचा अंदाज होता. त्या गोलंदाजाने ही माहिती ताबडतोब नानासाहेब पेशव्यांच्या कानावर घातली. पेशव्यांनी फर्मावलं.‘ गलबतात बायकामुले असतील तर त्यांना मारू नये. गलबताला जायचं असेल तिकडे जाऊ द्या. स्त्रीचा वध वेदात आणि शास्त्राला मान्य नाही.’ किनार्यावरचे गोलंदाज निराश मनानं परत गेले.
किनार्यावर येऊन त्यांनी पाहिलं तर गलबत तिथून पुढे गेलं होतं. पण अचानक गंगा- भागीरथीचं पात्र बदललं आणि त्या गलबतासमोर वाळूचा मोठा ढीग तयार झाला. गलबत अडकलं. ते पाहून गलबतातून नावा खाली टाकण्यात आल्या आणि गलबतातील बायकामुलं त्यात बसली. गलबतातली माणसं बाहेर येऊन नावा ढकलू लागली. ते पाहून किनार्यावरच्या गोलंदाजांनी नाव ढकलणार्या माणसांवर तोफेचे गोळे टाकण्याचं ठरवलं. नावेवर तोफेचा गोळा पडला मात्र नावेत दारूगोळा ठेवलेला होता, तो पेटून भडका उडाला. गलबतात बायका मुलं आहेत असं भासावं आणि गुपचूप दारू गोळा न्यावा असा शत्रूचा डाव असावा. ते द्दश्य पाहून किनार्यावरचे लोक गलबताकडे गेले. तिथे त्यांना दहा हजारापर्यंतचा खजिना सापडला. तो हस्तगत करून त्यांनी गलबतावरील बायकामुलं आणि माणसांना कैद करून श्रीमंतांपुढे पेश केलं. ब्रह्मावर्तात त्यांना कैद करून ठेवून त्यांच्यावर सैन्याचा पहारा ठेवला. तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडण्यासाठी बायकांची नेमणूक केली. एकदा एका शिपायानं पाहिलं की एक गोरी मडम एका कागदावर काही लिहून एका जागी ठेवते आहे. त्यावर तिनं दोन सोन्याच्या मोहरा ठेवल्या. काही वेळानं सफाई करणारी बाई आली, तिनं ते पत्र आणि मोहरा कनवटीला लावल्या. शिपायानं तिला हटकताच ती पळू लागली. शिपायांनी तिला पकडलं आणि श्रीमंतांसमोर उभं केलं. परंतु ती काहीच सांगेना तेव्हा तिला फटके देण्याचा हुकूम झाला, तेव्हा त्या बाईने कनवटीचं पत्रं शिपायाच्या हातात दिलं. इंग्रजी वाचणार्याला बोलावून ते पत्र वाचून घेण्यात आलं. त्यात त्या गोर्या स्त्रिनं लिहिलं होतं,’ कानपूरवर विजय मिळवून आल्यावर देशातले सैनिक नाच, तमाशे बैठकी यातच रंगलेले आहेत. फौजेचा बंदोबस्तही बरोबर नाही. तेव्हा शत्रू बेसावध आहे तोपर्यंत हमला करण्यासाठी इकडे येण्याचा विचार करावा. त्या गोर्या बायकांची राजकारणातली हेरगिरी ऐकून फौजेतल्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. श्रीमंतांच्या सौजन्याचा गैरफायदा घेणार्या त्या गोर्या स्त्रियांना ठार मारायला त्यांचे हात शिवशिवू लागले. परंतु श्रीमंतांनी त्यांना थोपवलं. ते म्हणाले,
‘ कोणत्याही प्रसंगी स्त्रिया आणि मुलं यांचा वध करावा ही आपली रीत नाही. स्त्रियांचा वध वेदात आणि शास्त्रात सांगितलेला नाही. स्त्रियांनी कितीही मोठा अपराध केला तरी त्यांना देहान्ताची शिक्षा देऊ नये. हे दुष्ट कर्म आपल्या हातून घडलं तर आपल्याला युध्दात जय मिळणार नाही.’’ फौजेतल्या लोकांना श्रीमंताचे विचार पटत नव्हते. फौजेतले शिपाई निराश मनाने छावणीकड परतले. परंतु फितुरी करणार्या स्त्रियांना मोकळंच सोडावं हे शिपायांच्या मनाला पटत नव्हतं. कैदखान्यात असलेल्या बायकामुलांचा त्यांनी वध केला. इतकंच नाही तर जागोजागी दंग्यात गोर्यांच्या बायकामुलं असतील त्यांना ठार मारावे अशी पत्रं पाठवली. आणि मग पुढे काय झालं? फौजेतले लोक सूड घेतल्याच्या आनंदात होते. परंतु श्रीमंत मनातल्या मनात उदास होते. असंच त्यांना वाटत होतं. ते तात्यांना वारंवार म्हणत होते, ‘ तात्या झालं ते बरं नव्हे.’’
स्वामी,जे झालं ते होऊन गेलं. आपण निराश न होता खंबीर रहा. आता पुढे काय करायचं याचा विचार करा. त्या द्दष्टीनं सैनिकांना सज्ज रहायला सांगा.’’
सुमारे पंधरा दिवसांनंतर कानपूरवर चहूबाजूंनी गोर्यांच्या पलटणी चालून आल्या. त्यांनी मोर्चे बाधायला सुरूवात केली. ही बातमी कळताच नानासाहेबांनी तात्यांना फर्मावलं,
‘ तात्या तुम्ही आणि लालपुरीबाबा गोसावी कानपूरास पुढे जा. ’’
‘ जशी आज्ञा.‘ श्रीमंतांची अनुज्ञा घेऊन तात्या गेले. पुढील तयारीला लागले.
कानपूरला पोचताच तात्या आणि लालपुरीबाबा यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. पंधरा दिवसांनी कानपूरच्या चारही बाजूंनी इंग्रजांच्या फौजा येऊन मोर्चे बांधून लढाईची सिध्दता करू लागल्या. बिगुल वाजले. त्याला उत्तर म्हणून रणशिंगं फुकली गेली. दोन्ही बाजूंनी तोफांच्या गोळ्यांचा मारा सुरू झाला. श्रीमंत नानासाहेब पेशवे जातीनं युध्दात उतरले. होताहोता सूर्यास्त झाला. दोन्ही बाजूकडील फौजा आपापल्या छावणीत पोचल्या. मशाली लावून उजेड करण्यात आला. कोणी जखमा झाल्यामुळे विव्हळत होतं, तर कोणी दिवसभराच्या उपवासमुळे भुकेले होऊन हातावरच साखरपुरी खात होते, हाताच्या ओंजळीनं पाणी पिऊन पुन्हा युध्दासाठी सज्ज होत होतं. दहाबारा दिवस रात्रंदिवस युध्द सुरू होतं. महायुध्दच ते. दोन्ही बाजूकडचे अनेक ऑफिसर, कप्तान, सुभेदार धारातीर्थी पडले. नानासाहेब पेशवे स्वत: मोर्च्यावर जाऊन तोफेला बत्ती देऊ लागले.
गोर्यांनी आपल्या तोफा मोर्च्यातून बाहेर काढून पुढे चाल सुरू केली. तोफगोळ्यांच्या मार्यानं पेशव्यांचे शिपाई हतबल होऊन मरणाच्या भीतीनं सैरावैरा पळू लागले. इकडे पेशव्यांच्या तोफेला बत्ती देणारा गोलंदाजच मारला गेला. तिथले शिपाई पळू लागले. नानासाहेब पेशव्यांचे बंधू बाळासाहेब यांनी स्वत: पुढे होऊन तोफेला बत्ती देण्याला सुरूवात केली तोच दुसर्या तोफेवरचा गोलंदाज मारला गेला. हळूहळू पेशव्यांच्या तोफा रिकाम्या पडू लागल्या. घोडेस्वार मागेमागे हटले. पायदळातले शिपाई जीवाच्या भीतीने पळू लागले. या शिपायांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. बाळासाहेबांनी सर्व परिस्थिती नानासाहेब पेशव्यांच्या कानावर घातली. पेशवे विचारात पडले. बाळासाहेबांनी सुचवलं की, आता माघार घेणंच उचित होईल. आपलया शिपायांना विनाकारण धारातीर्थी पडू देऊ नये. रावसाहेबांचं तरुण रक्त उसळून आलं.
‘ हे काय सुचवता आपण? काकासाहेब ! पेशवे युध्दातून माघार घेणार?
नानासाहेबांनी तात्यांकडे द्दष्टीक्षेप टाकला, तेव्हा त्यांनी रावसाहेबांना समजावणीच्या स्वरात सांगितलं, ‘ रावसाहेब, आपलं म्हणणं बरोबर आहे, पण आपण तात्पुरती माघार घेणार आहोत. आत्ता परत जाऊ, पुन्हा सैन्यसागर जमवू. आहे त्या सैन्याला अधिक सज्ज करू आणि परत येऊ. ’’ तात्यांचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं.
इंग्रज फौजांनी युध्दात जय झाल्याचा बिगुल वाजवला. त्यांनी पेशव्यांचे तंबूत मुक्काम ठोकून पेशव्यांचा तोफखाना, दारूगोळा, मेखजीन, बंदुका, तलवारी आणि खजिना ताब्यात घेतला.
इकडे पेशवे आणि साथीदार परत जात असताना गावातले लोक अडवून म्हणू लागले, ’ आता गोरे लोक येऊन आमची मुलंमाणसं मारतील, लुटालूट करून सर्व उध्वस्त करतील.’
तेव्हा श्रीमंतानी त्यांना धीर देत म्हटलं. ‘ आमची लढाई संपली नाही. तात्पुरती थांबली आहे. आम्ही हिंदुस्थानच्या लोकांसाठी प्राणपणानं लढत राहू. आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हेच आमचं कर्तव्य आहे.’’ हे ऐकून लोकांना जरा धीर आला परंतु मनाचं पूर्ण समाधान झालं नाही. लोकांनी आपली संपत्ती, भांडीकुंडी जमिनीत पुरून ठेवायला सुरूवात केली.
इकडे ब्रह्मावर्तास पोचताच नानासाहेबांनी धोतर पसरून त्यात महत्त्वाच्या आणि किंमती चीजवस्तू बांधून घेतल्या. कुटंबातील व्यक्तींना घेऊन गंगेत उतरून नावेत बसवलं आणि लखनौ प्रांतातील फत्तेपूरकडे प्रस्थान केलं. नावा पुढे पुढे जाऊ लागल्या.
+++++
देवळात आळेकरबुवा कीर्तनासाठी उभे झाले. आज देवळाच्या गाभार्यात कालच्यापेक्षा जास्त गर्दी होती. पण सर्वजण गप्प होते. इतकी माणसं एकत्र आलेली असताना टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता होती. कानपूर इथे श्रीमंत पेशव्यांचा पराजय झाला, हे ऐकून श्रोते व्यथित झाले होते.
बुवांनी झांजांचा गजर सुरू केला. सोबत हार्मोनियम वाजू लागली आणि कीर्तनाला सुरूवात झाली.राम राम सीताराम सीताराम/ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल / श्री ज्ञानदेव तुकाराम/ पंढरीनाथ महाराजकी जय/
श्रोते हो! श्रीमंत नानासाहेब पेशवे आपल्या कुटुंबियांसह अयोध्येतील त्यांचे स्नेही चौधरी भोपालसिंग यांच्याकडे प्रस्थान ठेवलं.
त्यापुढे काय सांगावे महाराजा त्यानंतर पूर्वी इंद्रजिताच्या प्रचंड यज्ञातून जसा अजिंक्य रथ निघेपर्यंत हवनाचा धडाका उडाला होता, तसेच इंग्रजांनी होमकुंडात हविर्दानाला सुरूवात केली. पहिले राज्य पंजाबचे, दुसरे ब्रह्मदेश, सातारा, नागपूर, होमकुंड धडाडत होते, अर्काटचे राज्य ढकला त्यात, तंजावरची गादी ढकला, अंगुलचे राज्य ढकला. जमीनदार, जहागिरदार, तालुकदार, वतनदार सगळे सगळे ढकला. आता लोकांना जाग आली शेकडो लोकांनी नानांना वचनपत्रे पाठवली.
बोलता बोलता बुवा गाऊ लागले, आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान- -
होऽ ऽ ! जय पराजयचे धक्के श्रीमंत नानासाहेब झेलत होते. जय मिळाला की उल्हसित होत, पराजयाने उदास होत. एक दिवस ते हताशपणे तात्यांना म्हणाले, ‘ तात्या, हे काय झालं? इंग्रजांनी आपल्या हिंदुस्थानच्या शिपायांना हरवलं. ’’
‘ स्वामी, असे निराश होऊ नका. आपण हिंमत सोडू नका. आपण तर हिंदुस्थानच्या जनतेचा आधार आहात. आपण हिंमत सोडली तर त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचं? ’’ तात्या खंबीर होते.
नानासाहेबांचाचा स्वर मात्र उदासच होता, ‘ तात्या, आपण शत्रूशी मुकाबला करणार कसा? सगळं छिन्नविछिन्न झालं आहे. ’’
‘ स्वामी, निराश होऊ नका. त्या बाहेरच्या वटवृक्षाकडे पहा. वारावादळ येवो, महापूर येवो, तो हिमतीनं सगळ्या संकटांना तोंड देतो. हांऽ. कमजोर पानं गळून जात असतील, पण वृक्ष ! तो खचत नाही. कारण हा वृक्षच सगळ्यांचा आधार असतो. घाबरलेले पक्षी याच्याच फांद्यांना घट्ट धरून बसतात. बावरलेले प्राणीही याच्याच आश्रयाला येतात. ’’
नानासाहेब खिन्नपणे हसले, ‘तात्या, धीर देणं तुमच्याकडून शिकावं. कितीही संकटं आली तरी तुमचं मन खंबीर असतं. या वृक्षासारखं. तात्या, आता आम्हाला हिंमतीनं उभं रहायलाच हवं.’’
‘ वा ! अगदी बरोबर बोललात.’’ तात्यांचा चेहरा खुलला.
‘ तात्या, आपलं विखुरलेलं सैन्य पुन्हा एकत्र आणणं, शस्त्र जमवणं, सैन्याच्या दाणापाण्याची सोय करणं या सगळ्याचं उत्तरदायित्व मी तुमच्यावर सोपवतो. ’’
तात्यांनी स्मित केलं, स्वामी सावरलेले पाहून तात्यांनाही हुरूप आला. ‘ स्वामी, आपला शब्द प्रमाण. हा तात्या तुमच्या हाकेला सदैव तत्पर आहे. स्वामी, आपल्या मनाची उभारी पाहून मलाही हिंमत आली. स्वामी, बेचाळीसावी रेजिमेंट पेशव्यांच्या निशाणाखाली लढण्याचा संकल्प करून शिवराजपुरी पर्यंत आली आहे.’’
‘ मग? तात्या वाट कसली पाहता? नानासाहेबांनी विचारलं.
श्रीमंताचा प्रश्न ऐकून तात्या उठून उभे झाले. ‘ खरंच! श्रीमंत, आता सरळ शिवराजपुरीला जातो आणि इंग्रजांविरूद्ध लढणार्या रेजिमेंटला आपली बाजू घ्यायला तयार करतो. आज्ञा द्यावी स्वामी.’’ नानासाहेबांनी मानेनेच रूकार दिला. तात्यांना हातानं पुढे जायला सुचवलं. तात्यांचा चेहरा आनंदानं उजळला. ते उत्साहानं गेले. जणू इथूनच घोड्यावर बसून शिवराजपुरी कडे निघाले.
नानासाहेब स्वत:शीच म्हणाले, ’ तात्यांचा शूरपणा पूर्वी कधी आमच्या लक्षातच आला नाही. खरं तर कितीतरी आधी त्यांच्या हातातील कलम काढून तलवार द्यायला हवी होती. यापूर्वीच आम्हाला हे का बरं सुचलं नाही? निदान इतकी प्राणहानी तरी झाली नसती. आमचं पद अबाधित राहिलं असतं. अझिजान, अझिमुल्ला यांच्या सारख्या उतावळेपणानं काहीतरी निर्णय घेणार्यावर वचक बसला असता. गजानना, एक मौल्यवान हिरा आमच्या पदरातच होता पण आम्हाला त्याची चमक दिसलीच नाही. आमचंच दुर्दैव. - - दुर्दैव म्हणायचं, की आमचा आंधळेपणा? तात्यांनी आम्हाला कितीदा तरी जीव तोडून सांगितलं होतं की, इंग्रज जे काही करतात ते योजनापूर्वक करतात. आमच्या ते कानावरून जात होतं पण मनात कधीही शिरलं नाही. का असं झालं? खरंतर तात्या, आमचे बालमित्र. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो. घोड्यावर बसायला शिकलो. रपेटी मारल्या. शस्त्रं चालवायला शिकलो, पण तरीही आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही. गणराया, हे असं कसं झालं आमच्याकडून.

Comments
Post a Comment